ऑपरेशन सिंदूरनंतर Indian Railway अलर्टवर; ब्लॅकआउट, इमरजन्सीनंतर अनेक ट्रेन रद्द

0

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कर्मचाऱ्यांना एक महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाने सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाकिस्तान गुप्तचर यंत्रणा भारतीय सैन्य रेल्वेची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर ब्लॅकआउट आणि इमरजन्सीची स्थिती पाहता भारतीय रेल्वेने अनेक ट्रेन रद्द केल्या आहेत. काही ट्रेन रीशेड्युलदेखील केल्या आहेत. या रेल्वेची एक यादी पाहुयात.

रेल्वे बोर्डाकडून करण्यात आलेल्या निवेदनानुसार, सैन्याच्या विशेष रेल्वेगाड्यांबद्दलची माहिती उघड करू नका. ही माहिती उघड करणे हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरू शकतो, असा संदेश रेल्वे बोर्डाकडून सर्व रेल्वे विभागांच्या प्रमुख मुख्य संचालन अधिकाऱ्यांना हा संदेश पाठवण्यात आला आहे. तसंच, कोणत्याही अननोन कॉल्स आणि संदेशांला रिप्लाय देऊ नये. याची माहिती लगेचच वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

कर्मचाऱ्यांना दिलेले आदेश

अननोन नंबरवर आलेल्या कॉलपासून सतर्क राहा

सैन्याच्या रेल्वे गाड्याबाबत माहिती उघड करू नका

कोणत्याही अननोन फोनचा संपर्क झाल्यास लगेच रिपोर्ट करा.

संचार प्रोटोकॉलचा पालन करणे गरजेचे

याशिवाय, रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ब्लॅकआउट आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे काही रेल्वे सेवांवर परिणाम होईल अशी माहिती उत्तर पश्चिम रेल्वेने दिली आहे. या परिस्थितीमुळे, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेतच, परंतु काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही 9 मे 2025 रोजी सहलीचे नियोजन करत असाल तर काळजीपूर्वक विचार करा. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शशी किरण म्हणाले की, सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेच्या कामकाजात बदल करण्यात आले आहेत. ब्लॅकआउट परिस्थिती आणि आपत्कालीन व्यवस्थेमुळे, रेल्वेला काही गाड्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द कराव्या लागल्या आहेत आणि काही गाड्यांचे वेळापत्रक बदलावे लागले आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

या गाड्या 9 मे 2025 रोजी धावणार नाहीत.

ट्रेन क्रमांक 14895 – भगत की कोठी ते बाडमेर रद्द

ट्रेन क्रमांक 14896 – बारमेर ते भगत की कोठी रद्द

ट्रेन क्रमांक 04880 – मुनाबाव ते बाडमेर रद्द

ट्रेन क्रमांक 54881 – बाडमेर ते मुनाबाओ रद्द

या गाड्या उशिराने धावतील.

गाडी क्रमांक 14807 – जोधपूर ते दादर एक्सप्रेस 9 मे रोजी जोधपूर येथून 05.10 ऐवजी 08.10 वाजता (3 तास उशिराने) निघेल.

ट्रेन क्रमांक 14864 – जोधपूर ते वाराणसी सिटी एक्सप्रेस 9 मे रोजी जोधपूर येथून 08.25 ऐवजी 11.25 वाजता (3 तास उशिराने) निघेल.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार