भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून केलेली कारवाई चीनच्या नाकाला झोंबल्याचं पाहायला मिळत आहे. तर आधी दहशतवादावर कठोर कारवाई करण्याची भूमिका घेणाऱ्या अमेरिकेने देखील भारतीने केलेल्या कारवाईवर ‘इट इज शेम’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू तणावाबाबत बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने भारताने केलेली लष्करी कारवाई दुर्दैवी असल्याचं म्हणत पाकिस्तानची बाजू घेतली आहे.






शिवाय ऑपरेशन सिंदूरमुळे सद्यस्थितीबाबत आम्ही चिंतेत आहोत. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश असून ते चीनचेही शेजारी आहेत असं म्हणतच चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो, असंही चीनने म्हटलं आहे. दरम्यान, दोन्ही देशांनी शांततेच्या दृष्टीने विचार करावा, संयम बाळगावा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल असं कोणतंही पाऊल उचलू नये, असं आवाहान देखील त्यांनी यावेळी दोन्ही देशांना केलं आहे.
त्यामुळे सदैव दहशताद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई केल्यानंतर चीन नेहमीप्रमाणे पाकिस्तानला पाठीशी घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आज भारतीय लष्काराने पत्रकार परिषद घेत तपासात पहलगाम येथील हल्ला करणारे दहशतवादी आणि पाकिस्तान यांच्यात असणारे संबंध उघडकीस आल्याचं स्पष्ट केलं आहे.











