नामांकित बांधकाम व्यावसायिक ‘बढेकर ग्रुप’ने असंख्य प्रकल्प करून नाते विश्वासाचे दृढ करावे : मंत्री माधुरी मिसाळ

0

पुणे ता.२: कोथरूड परिसरातून प्रवास करताना अनेक ठिकाणी ‘बढेकर ग्रु’पचे बोर्ड लागलेले दिसतात, त्या बोर्डावरची टॅगलाईन ‘नाते विश्वासाचे’ मला खूप आवडली. लोकांमधून मला समजले की, ‘बढेकर ग्रुप’ बांधकाम चांगले व वेळत पूर्ण करतात’, त्यामुळे अशा नामांकित बांधकाम व्यावसायिक कंपनीने असंख्य बांधकाम प्रकल्प साकारावेत,” अशी भावना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त करून, ‘बढेकर ग्रुप’च्या सहकारनगर येथील प्रकल्प पूर्तीसाठी शुभेच्छा दिल्या. ‘बढेकर ग्रुप’च्या माध्यामातून सहकार नगर येथे पुनर्विकसित होत असलेल्या ‘भावेश’ या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन अक्षय्य तृतीया’च्या शुभमुहर्तावर बुधवार (ता.३०) करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री मिसाळ बोलत होत्या. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, बढेकर ग्रुप’चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण बढेकर, माजी शिक्षण अधिकारी बजरंग अवारी, सोसायटीचे सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  दिवाळीचा पुणे मेट्रोला ‘झटका’! आर्थिक गणित बिघडले प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर

प्रवीण बढेकर म्हणाले, ”आमच्या कार्याची दखल घेऊन मंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलेला विश्वास आमच्यासाठी मोठा सन्मान आहे. ‘नाते विश्वासाचे’ ही टॅगलाईन आमच्या बांधकामाच्या प्रत्येक टप्प्याला मार्गदर्शक ठरते. सहकारनगर सारख्या प्रतिष्ठित भागात ‘भावेश’ गृहप्रकल्पाचे भूमिपूजन अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर झाले, ही आमच्यासाठी शुभ सुरुवात आहे. सोसायटीच्या सभासदांचा विश्वास, प्रशासनाचे पाठबळ, आमच्या कामाला नवी दिशा देतो. दर्जा आणि वेळेचे भान ठेवून प्रकल्प पूर्ण करणे, हे आमचे प्रथम कर्तव्य आहे.”