वाहतूक कोंडीने कोंढलेला कर्वेनगरचा ‘श्वास’ सोडवण्याचे चंद्रकांत मोकाटे यांचे आश्वासन कर्वेनगर परिसरात उत्साही प्रतिसाद

0

कर्वेनगर परिसरात वाहतुकीची समस्या व कोंडी मोठया प्रमाणावर होतं आहे कर्वेनगर ते वारजे उड्डाणंपुलचौक दरम्यान माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी चांगली उड्डाणंपूलाची योजना मंजूर करून घेतली होती पण ही योजना बदलून त्याऐवजी कर्वेनगर मध्ये फक्त उड्डाणंपुल केला या उड्डाणंपूलामुळे वाहतुकीची समस्या कमी होण्याऐवजी वाढलीच आहे अशा प्रतिक्रिया या परिसरातील नागरिक व लोकप्रतिनिधीनी व्यक्त केल्या.

महाविकास आघाडीचे उमेदवार श्री चंद्रकांत मोकाटे यांनी आज बुधवारी कर्वेनगर व दुधाने वस्तीमध्ये पदयात्रेद्वारे नागरिकांशी संपर्क साधून संवाद साधला ठिकठिकाणी त्यांच्या पदयात्रेस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, नगरसेवक स्वप्नील दुधाने, माजी स्विकृत नगरसेवक नंदू घाटे, दशहरी चव्हाण, पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय खळदकर, संतोष वाघमारे, जगदीश दिघे, रविराज इंगुळकर, अजय भुवड, किरण बराटे, वैशाली दिघे, पल्लवी नागपुरे डॉ अभिजित मोरे गोविंद थरकुडे आदी सहभागी झाले होते. चंद्रकांत मोकाटे यांची आज इंगळे नगर, दत्त दिगंबर कॉलनी, जावळेकर वस्ती आदी भागात पदयात्रा झाली.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

माजी नगरसेवक स्वप्निल दुधाने म्हणाले की, कर्वेनगर ते वारजे उड्डाणंपुल चौक दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार श्री चंद्रकांत मोकाटे यांनी उड्डाणंपूलाची योजना आखली होती ती मंजूरही केली. पण त्यांच्या नंतर आलेल्या लोकप्रतिनिधीनी त्यामध्ये बदल केला आणि फक्त कर्वेनगर पुरताच उड्डाणंपुल केला गेला त्यामुळे वाहतुकीची कोंडी व समस्या दूर होण्याऐवजी ती वाढल्याचे चित्र आहे या परिसरात 50 हजाराहून अधिक नागरिक राहतात त्यांचा विचार कोण करणार माजी स्विकृत नगरसेवक नंदू दिघे म्हणाले की, कर्वेनगर ते वारजे उड्डाणंपुल अर्धवट केल्याने या परिसरात वाहतुकीची समस्या वाढली आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय खळदकर यांनी सांगितलं की कर्वे नगर परिसरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे ती सोडविण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नाही. गोविंद थरकुडे म्हणाले की, या परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होतं नाहीत