मॉडर्न विकास मंडळ, पुणे या संस्थेच्या वतीने दिनांक ०१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पुण्याचे नाव देशपातळीवर गौरव पूर्णः कामगीरी करणारी कु.ऋतुजा वऱ्हाडे या १७ वर्षीय विध्यार्थिनीने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(NDA) प्रवेश परीक्षेच्या १५४ व्या कोर्सच्या निकालात ऐतिहासिक यश मिळवले. देशात प्रथम (AIR 1) सर्वसाधारण यादीत तृतीय क्रमांक पटकावत तिने महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला अभिमानास्पद कामगिरी केली.






या तिच्या अभिमानास्पद कामगिरी बद्दल माजी केंद्रीय मंत्री मा.प्रकाशजी जावडेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले, या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र कार्यालयीन मंत्री मा.रवीजी अनासपुरे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मा.प्रवीणजी बढेकर, संपादक सकाळ माध्यम समूह (मल्टीमिडिया) चे श्री.अंकितजी काणे, नगरसेवक मा. जयंतजी भावे, डॉ.संदीप बुटाला व सौ.मनीषाताई बुटाला हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
तसेच यशोतेज अकादमीचे संचालक श्रीयुत तेजस पाटील सर यांना देखील गौरविण्यात आले, विशेष म्हणजे कु.ऋतुजा वऱ्हाडे हिने यशोतेज अकादमी मध्ये श्रीयुत तेजस पाटील सर यांचे मार्गदर्शन घेतले.









