पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, त्या घटनेला आता आठवडा पूर्ण झाला आहे. या हल्ल्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांचं अर्थसहाय्य महाराष्ट्र सरकार करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला असून पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना ५० लक्ष रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तसेच पुण्यातील मृत संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आलेले आहे.






पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातवरण निर्माण झालंय. तर हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आलाय. आतापर्यंत पहलगाम हल्ल्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. त्यावरुन हा हल्ला किती क्रूर होता, हे लक्षात येतंय.
हल्ल्यानंतर पाक सेनाप्रमुख जनरल सैयर असीम मुनीर यांनी देश सोडून पलायन केल्याचं बोललं जातंय. स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने अनेक माध्यमांनी हा दावा केला आहे. एमआयए म्हणजे मिसिंग इन अॅक्शन असल्याचं सांगितलं जात आहे. काही रिपोर्टनुसार, रावळपिंडी येथील एक बंकरमध्ये ते लपले आहेत. मात्र पाकिस्तान सरकारकडून असे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. लष्कर प्रमुखांच्या बातम्या माध्यमांमधून आल्यानंतर पाकिस्तान सरकारने रविवारी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासोबत जनरल मुनीर यांचा कार्यक्रमामधला एक फोटो शेअर केला आहे. त्यातून ते देश सोडून गेले नसल्याचं दाखवण्यात येत आहे. एकूणच दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.











