मराठा-ब्रिटिश युद्ध निशाणी; श्रीमंतराजे भोसलेंची प्रथम तलवार ऑनलाईन विक्रीस; 7000 ग्रेट ब्रिटन पाउंडमध्ये लिलाव होणार अशी चर्चा

0

नागपूरमधील भोसले घरण्याची ऐतिहासिक तलवार चक्क आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाइन विक्रीला काढण्यात आली आहे. श्रीमंत राजे रडुजी महाराज भोसले (प्रथम) यांच्या ऐतिहासिक तलवारीचा लिलाव होणार आहे. दरम्यान, नागपूरकर भोसले घराण्याची तलवार कंपनीपर्यंत इंग्लंडला कशी गेली? असा प्रश्न नागपूरकर, पत्रकार, इथिहासाकर, इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींना पडला आहे.

न्यूयॉर्कचे एक ब्रोकर कंपनीने तलवारीचा लिलावात ठेवला आहे, नागपूरचे संस्थापक श्रीमंत रघुजी महाराज भोसले प्रथम यांची तलवार असल्याचा दावा विक्रीच्या जाहिरातीत कंपनीकडून करण्यात आला आहे. १८५३ ते १८६४ या कालावधीत श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले, दुसरे (उर्फ आप्पासाहेब महाराज) यांच्या नेतृत्वात मराठा विरुद्ध ब्रिटिश युद्ध झाले होते. या कालावधीत ब्रिटिशांनी नागपुरात खजिना लुटल होता, त्यामध्ये कदाचित ही तलवार गेली असावी अशी शक्यता आहे. मात्र ही तलवार विक्री करणाऱ्या कंपनीकडे कशी गेली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

Sotheby’s ही ब्रिटिशांची मल्टिनॅशनल कंपनी असून त्याचे मुख्यालय न्यूयॉर्कला आहे. कंपनीत सात हजार ग्रेट ब्रिटन पाउंडमध्ये लिलाव होणार अशी चर्चा आहे. या लिलावामुळे इतिहासकार, पत्रकार, शिवप्रेमी आणि सामान्य जनतेत उत्सुकता आणि प्रश्नांचा काहूर निर्माण झाला आहे. ही तलवार इंग्लंडपर्यंत कशी पोहोचली, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. १८५३ ते १८६४ या कालावधीत झालेल्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी नागपूरच्या भोसले राजघराण्याचा खजिना लुटला होता. यात रत्नजडित दागिने, शस्त्रसाठा आणि तलवारींचा समावेश होता. कदाचित याच लुटीदरम्यान ही तलवार इंग्लंडला गेली असावी, अशी एक शक्यता आहे. दुसरी शक्यता अशी की, एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ही तलवार गुप्तपणे नेली आणि कालांतराने ती विकली किंवा कोणाला भेट दिली असावी.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार