चीनने रंग दाखवले, पाकिस्तानच्या बाजूने उतरला मैदानात, हे घातक मिसाइल भारतावर चालवण्यासाठी दिलं

0

सध्या भारत-पाकिस्तानमध्ये मोठा तणाव आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर खवळलेला भारत कसा बदला घेणार? हीच भिती पाकिस्तानला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडलेल्या पाकिस्तानच्या मदतीला अखेर चीन धावून आला आहे. चीनने सवयीप्रमाणे आपले खरे रंग दाखवले आहेत. चीनने पाकिस्तानला 100 पेक्षा जास्त PL-15 लॉन्ग रेंज एअर टू एअर हल्ला करु शकणारी (VLRAAM) मिसाइल्स दिली आहेत. हा तणाव कुठल्याही क्षणी मोठ्या युद्धात बदलू शकतो, हा त्यामागचा संदेश आहे. या मिसाइल्सची रेंज 200 किलोमीटर असल्याच सांगितलं जातं. PL-12 पेक्षा ही रेंज अधिक आहे. JF-17 मधून PL-12 ची 100 किलोमीटर रेंज आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

पाकिस्तानी एअरफोर्सने PL-15 एयर-टू-एयर मिसाइल (VLRAAM) JF-17 थंडर ब्लॉक-3 मध्ये फिट केलं आहे. विंग टिप्सवर PL-10E WVRM HOBS सक्षम मिसाइल दिसतेय. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान पाकचे परराष्ट्र मंत्री आणि चिनी डिप्लोमॅट्सची बैठक झाली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनचे आभार सुद्धा मानले आहेत.

तणावाने टोक गाठलेलं असताना पाकिस्तानला मदत

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन माहिती दिली की, चिनी राजदूत जियांग जैदोंग यांनी उपपंतप्रधान/परराष्ट्र मंत्री सीनेटर मोहम्मद इशाक डार यांच्याशी चर्चा केली. दोघांनी सधाच्या परिस्थितीवर चर्चा केली. अलीकडच्या काही वर्षात पाकिस्तान आणि चीनमध्ये रणनितीक भागिदारी अधिक दृढ झाली आहे. तणावाने टोक गाठलेलं असताना चीनने पाकिस्तानला ही मदत केली आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

पाकिस्तानसाठी या वीटो पावरचा अधिकार वापरला

भारताविरुद्ध लढाई एकट्या पाकिस्तानला पेलवणारी नाही. त्यामुळे ते नेहमीच चीनकडे हात पसरतात. आता सुद्धा त्यांनी तेच केलय. चीनने शस्त्रास्त्र देण्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच पाकिस्तानची पाठराखण केली आहे. चीनकडे संयुक्त राष्ट्रात वीटो पावर आहे. चीनने अनेकदा पाकिस्तानसाठी या वीटो पावरचा अधिकार सुद्धा वापरला आहे.