अरबी समुद्रात हालचालींना वेग, पाकिस्तानी युद्धनौकांकाडून क्षेपणास्त्र डागण्याचा सराव, भारतीय नौदलही सज्ज

0

काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलल्यानंतर पाकिस्तान कमालीचा सावध झाला आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबारात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. देशभरात याचे संतप्त पडसाद उमटले होते. यानंतर दिल्लीत पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि संरक्षण मंत्रालयांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. संरक्षण दलाने भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करणार का, या भीतीने पाकिस्तान प्रचंड घाबरला आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याने हाय अलर्ट जारी केला आहे.

पाकिस्तानी वायूदलाची लढाऊ विमाने कालपासून सीमारेषेवर गस्त घालत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानी नौदलाने अरबी समुद्रात लष्करी कवायत सुरु केली आहे. पाकिस्तानी नौदलाच्या ताफ्यातील युद्धनौकांवरुन क्षेपणास्त्रे डागण्याचा सराव सुरु आहे. अरबी समुद्राच्या उत्तर भागात या लष्करी कवायती सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नौदलाकडून व्यापारी जहाजांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्यापारी जहाजांनी लष्करी कवायती सुरु असलेल्या भागात येऊ नये. या लष्करी कवायती 24 एप्रिल ते 25 एप्रिल या काळात सुरु असतील, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक केला जाऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. दिल्लीत बुधवारी संरक्षण मंत्रालयात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर भारतीय नौदल आणि वायूदल कमालीचे सक्रिय झाले आहे. त्यामुळे भारताकडून कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानला आहे. त्यामुळे पाकिस्तानने पहलगाम हल्यानंतर लगेचच वायूदलाला अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले होते. त्यामुळए पाकिस्तानची टेहळणी विमाने ही भारतीय सीमारेषेलगत गस्त घालताना दिसत आहेत.

पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून परत येताना विमानाचा मार्ग बदलला

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच मोदी हा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले होते. पंतप्रधान मोदी यांनी सौदीला जाताना पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर केला होता. परंतु, भारतात परत येताना मोदींनी पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर केला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात उच्चपदस्थीय बैठक बोलावली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा