कोथरूड विधानसभा मतदारसंघ असा नाम उल्लेख जरी झाला तरी महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण करण्यामध्ये या विधानसभा मतदारसंघाने यश मिळवल आहे. महाराष्ट्र राज्यात आदर्शवत वाटावं असा मतदारसंघ बनवण्यामध्ये विद्यमान आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे विचार आचार आणि उपक्रम हे कायमच चर्चेत राहत असतात. कोथरूड विधानसभा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी, ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेटमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते) अशी भलीमोठी जंत्री असली तरी सुद्धा संघटन परवांतर्गत कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या नियुक्त यांचा विचार करता कोथरूड विधानसभा मतदारसंघावर विद्यमान नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचेच वर्चस्व असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये आज सर्वाधिक पदाधिकारी संपर्क जर कोणत्या नेत्यांचा असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त चंद्रकांत दादा पाटीलच असे कार्यकर्त्यांकडून गर्वाने सांगितले जाते. कोथरूड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघातील स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी अत्यंत जिव्हाळ्याने संपर्क साधत चंद्रकांत दादा पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने यश मिळवले. (विशेष म्हणजे भूमिपुत्र असलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यापेक्षाही जास्त मते) त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या ज्या ठिकाणी संघटन आपल्या ताब्यात नाही अशा ठिकाणी आपली यंत्रणा सक्रिय करण्याचा संकल्प करत कोथरूड विधानसभा मतदारसंघ पुन्हा नव्याने चंद्रकांतदादा पाटील यांनी बांधण्यास सुरुवात केला आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
आगामी काळामध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवरून हितसंबंधाच्या लोकांचा दबाव येणार हे ग्राह्य धरत संपूर्ण मतदारसंघांमध्ये आपली पकड घट्ट ठेवण्यासाठी नुकत्याच पार पडलेल्या संघटन पर्व निवडीमध्ये नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपला वरचष्मा कायम राखला आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान बाणेर बालेवाडी पाषाण या भागामध्ये संघटनात्मक पातळीवर आपली पकड घट्ट नसल्याची जाणीव झाल्यानंतर या भागातील स्थानिक कार्यकर्त्यांना विविध स्तरावरती पाठबळ देत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी बहुमोल योगदान दिले. त्यामुळेच प्रचंड नाराजी असतानाही या भागातून भारतीय जनता पक्षाला पर्यायाने विद्यमान आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना प्रचंड मते मिळाली. आगामी काळातील धोका लक्षात घेऊन या संघटनपर्वाच्या निमित्ताने ‘दबंगवृत्ती’च्या स्वहितार्थ भूमिका घेणाऱ्या युवा चेहऱ्यांचा पक्का कार्यक्रम करत श्री लहू बालवडकर- कोथरूड (उत्तर)मंडल, अशी नियुक्ती करून त्या भागातही संघटनात्मक कार्य किती महत्त्वाचे आहे आणि आगामी काळामध्ये पक्षांमध्ये त्याला अतिउच्च स्थान राहणार याची जाणीव करून दिली. तर केंद्रीय मंत्री यांच्या मर्जीनुसार विधानसभा मतदारसंघातील श्री निलेश कोंढाळकर यांची -कोथरूड (मध्य) मंडल म्हणून झालेली नियुक्ती जरी वेगळी वाटत असली तरी सुद्धा झालेल्या मतांचा विचार करता या निवडीमध्येही दादांची छाप प्रकर्षाने जाणवते. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अत्यंत प्रभावी मतदान असलेल्या प्रभात 13 या भागावर राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वर्चस्व असल्याचे बोलले जात असताना या मुख्य प्रभागावरती आपली पकड मजबूत करण्यासाठी योग्य आखणी करत श्री कुलदीप सावळेकर – (कर्वेनगर -एरंडवणा) मंडल यांची नियुक्ती झाल्याने पुन्हा एकदा कोथरूड विधानसभा मतदारसंघावरती नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे इच्छा आहे की काय अशी नव्याने चर्चा सुरू झाली आहे.