झहीर खान आणि सागरिकाच्या घरी झाले छोट्या पाहुण्याचे आगमन, नाव आहे एकदम युनिक

0

क्रिकेटपटू झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. त्या दोघांना मुलगा झाला आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. या जोडप्याने बुधवारी संयुक्त पोस्ट शेअर केली आणि मुलाच्या आगमनाची घोषणा केली. फ्रेममध्ये, झहीर खान त्याच्या मुलाला मांडीवर धरलेले दिसत आहे तर सागरिका झहीरच्या खांद्याभोवती हात ठेवून आहे. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव फतेहसिंह खान असे ठेवल्याची माहिती कॅप्शनमधून दिली आहे. या जोडप्याने एक गोंडस कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे.

सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

१६ एप्रिल रोजी सकाळी झहीर खान वडील झाल्याची बातमी त्याची पत्नी सागरिका घाटगे यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून त्यांच्या चाहत्यांना तिने सांगितली. सागरिकाने तिच्या इंस्टाग्रामवर लिहिले की तिच्या घरी एका बाळाचा जन्म झाला आहे, ज्याचे नाव फतेह सिंग खान आहे. ग्रे शेडयामध्ये फोटो शेअर करताना या जोडप्याने लिहिले, “प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादाने आम्ही आमच्या मौल्यवान लहान मुलाचे, फतेहसिंह खानचे स्वागत करतो.”