श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना अखेर बिगुल वाजलच! “झुंडी”ने डाव साधला अन् संस्थापकाच्या पदरी निवडणूक लादली!

0
1

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या दृष्टीने अत्यंत हळव अन् जिव्हाळ्याचे पान आपल्या हयातीमध्ये या सहकारी साखर कारखान्यावर सर्वपक्षीय लोकांना एकत्र घेत बिनविरोध निवडणूक करण्यासाठी त्यांनी वाटेल त्या तडजोडी पदरी घेत अतोनात प्रयत्न केले परंतु अखेर त्यांच्याच गटामध्ये अर्ज माघारी घेण्यास अपयश आल्याने त्यांना स्वतःच्या जागेसाठी पुन्हा मतदारांच्या दारात जाणे भाग पडले आहे. मा.श्री. विदुराजी उर्फ नानासाहेब नवले मावळ मुळशी हवेली खेड शिरूर या पाचही तालुक्यांमध्ये ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं या पाच तालुक्यांमधील सुमारे आठ आमदारांनाही त्यांच्याविषयी विशेष जिव्हाळा असल्याने त्यांच्या ज्येष्ठत्वासाठी सर्वांनीच ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु विधानसभा काळात रात्रंदिवस धावपळ करणाऱ्या इच्छुक कार्यकर्त्यांना संधी देण्यात अपयश आल्यामुळे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले ज्या गटातून निवडणूक लढत आहेत त्याच गटाची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी एकूण २१ जागेकरिता २२६ इतकी नामनिर्देशन पत्रे प्राप्त झालेली होती. त्यापैकी २६ नामनिर्देशन पत्रे ही दुबार तर ५ नामनिर्देशन पत्रे ही नामंजूर करण्यात आली. उर्वरीत वैध १९५ पैकी 22 जागांवरती नामनिर्देशन शिल्लक राहिल्याने फक्त एका गटासाठी निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे संस्थापक अध्यक्ष विदुराजी उर्फ नानासाहेब नवले यांच्या गटातच बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना अपयश आल्याने हा अट्टाहास नक्की का करण्यात आला हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुळात पाचही तालुक्यांमध्ये विद्यमान संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या विषयी प्रचंड आस्था असतानाही नानासाहेब नवले यांनी सर्व आमदारांना बरोबर घेऊन बिनविरोध करण्याचा प्रयत्न का केला हा प्रश्न निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

सदर कारखान्याच्या मंजूर निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या दि. ११.०३.२०२५ ते २५.०३.२०२५ या कालावधीत नामनिर्देशन पत्रे मागे घेतल्यानंतर मतदारसंघ निहाय शिल्लक उमेदवारांची स्थिती खालीलप्रामाणे आहे.

ऊस उत्पादक गट क्र. १            हिंजवडी-ताथवडे निवडून द्यावयाच्या जागा ३

१ नवले विदुराजी विठोबा

२ भुजबळ चेतन हुशार

३ जाधव दत्तात्रय गोपाळ

४ भिंताडे बाळु दत्तात्रय

ऊस उत्पादक गट क्र.२              पौड-पिरंगुट निवडून द्यावयाच्या जागा ३

१ ढमाले धैर्यशिल रमेशचंद्र

२ गायकवाड यशवंत सत्तू

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

३ उभे दत्तात्रय शंकरराव

ऊस उत्पादक गट क्र.३               तळेगाव-वडगाव निवडून द्यावयाच्या जागा ३

१ दाभाडे ज्ञानेश्वर सावळेराम

२ भेगडे बापुसो जयवंतराव

३ काशिद संदिप ज्ञानेश्वर

ऊस उत्पादक गट क्र. ४               सोमाटणे-पवनानगर निवडून द्यावयाच्या जागा ३

१ कडू छबुराव रामचंद्र

२ लिम्हण भरत मच्छिंद्र

३ बोडके उमेश बाळू उर्फ बाळासाहेब

 ऊस उत्पादक गट क्र.५               खेड-शिरुर-हवेली निवडून द्यावयाच्या जागा ४

१ लोखंडे अनिल किसन

२ भोंडवे धोंडिबा तुकाराम

३ कोतोरे विलास रामचंद्र

४  काळजे अतुल अरुण

महिला राखीव               निवडून द्यावयाच्या जागा २

१ अरगडे ज्योती केशव

२ वाघोले शोभा गोरक्षनाथ

अनुसूचित जाती/जमाती              निवडून द्यावयाच्या जागा

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

१ भालेराव लक्ष्मण शंकर

इतर मागासवर्ग              निवडून द्यावयाच्या जागा- १

१ कुदळे राजेंद्र महादेव

विमुक्त जाती/भटक्या जमाती/विमाप्र.               निवडून द्यावयाच्या जागा – १

१ कोळेकर शिवाजी हरिभाऊ

वरील सर्व अर्ज ग्राह्य झाले असून एकमेव जास्त अर्ज राहिलेल्या ऊस उत्पादक सभासद मतदार संघ गट क्र.१ हिंजवडी-ताथवडे या गटातून निवडून द्यावयाच्या ३ जागेकरिता एकूण ४ नामनिर्देशन पत्रे शिल्लक राहीलेली असल्याने सदर गटातील निवडणूक लढविणाऱ्या ४ उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलेले आहे.

सदर मतदार संघाकरिता दि. ०५.०४.२०२५ रोजी सकाळी ८ ते ५ या कालावधीत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, खेड, हवेली-शिरुर या तालुक्यातील एकूण ५७ मतदान केंद्रावर मतदान पार पडणार असून कारखान्याचे एकूण २२२५८ मतदार मतदानाची कार्य पूर्ण व करणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.०६.०४.२०२५ रोजी सकाळी ९ मतमोजणी सुरू होणार आहे. मतदान केंद्रे व मतमोजणी ठिकाण प्रसिद्ध करणेत येईल.