महाराष्ट्रातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठाची घर घर प्रचंड वाढली असून पुण्यातील आमदारच या विभागाचा मंत्री असतानाही नामांकित आणि ऐतिहासिक संदर्भ असलेल्या या संस्थेचे दिवाळे निघते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना पुण्यासारख्या शहरामध्ये माफक दरामध्ये शिक्षण घेण्याचे एकमेव ठिकाण म्हणून पुणे विद्यापीठाची ओळख होती पश्चिम महाराष्ट्र आज सह राज्यातील विविध भागातील विद्यार्थी प्रवेशासाठी या विद्यापीठाला प्राधान्य देत असताना शासकीय पातळीवरती मात्र विद्यापीठाचा पूर्वीचा दर्जा आणखी रसातळाला घालवण्यात भर घालत आहेत की काय अशी स्थिती आहे. राज्य सरकारची प्राध्यापक भरतीची प्रक्रिया रखडल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या एकूण ३८४ पदापैंकी २३८ प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. सध्या विद्यापीठात फक्त १० प्राध्यापक कार्यरत आहेत. या रिक्त पदांमुळे पुणे विद्यापीठातील शैक्षणिक घडामोडी आणि संशोधनासाठी लागणारी यंत्रणाच कोलमडली असून, विद्यापीठाचे देश पातळीवरील मानांकन खाली घसरले आहे. सद्यपरिस्थिती न बदलल्यास जवळजवळ पुणे नगर आणि नाशिक विभागातील गोरगरीब मुलांसाठी आश्रय असलेले अन् मराठी भाषेचा प्रसार-प्रचार करणारे विद्यापीठ रसातळाला जाण्याची भीती आहे.






नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या (एनआयआरएफ) सर्वसाधारण गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ३७व्या क्रमांकाहून थेट ९१ व्या क्रमांकावर घसरण झाली. या प्रकारामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाली असून, कुलगुरूंनी राजीनामा देण्याची मागणी होत आहे. संस्थेचा स्तर उंचावण्यासाठी ठोस योजने गरजेचे असताना मात्र या गोष्टीचे हे राजकारण करण्यामध्ये दंग असलेल्या यंत्रणांना मात्र संस्थेचे संस्थेविषयी कोणतीही आपुलकी राहिली नाही का?, पुणे विद्यापीठात शिकवायला प्राध्यापकच नसतील, तर कुलगुरू किंवा विद्यापीठ प्रशासन काय करणार यावर कोणीही आज बोलायला तयार नाही. सध्या विद्यापीठात प्राध्यापकांच्या ३८४ जागा मंजूर असून, त्यापैकी केवळ १४६ प्राध्यापक कार्यरत आहेत. निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे २३८ जागा रिक्त आहेत. रिक्त पदांची संख्या गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ही पदे भरण्यासाठीची कार्यवाही उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून संथ गतीने सुरू आहे. त्यातही १११ पदे भरण्याचीच मंजुरी देण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक बाबी उपस्थित झाल्याने, अजूनही भरती प्रक्रिया सुरूच आहे. पुणे विद्यापीठाने कंत्राटी पद्धतीने प्राध्यापकांची नेमणूक करून, तातडीची गरज भागविण्याचा तात्पुरता प्रयत्न केला आहे.
प्राध्यापकांच्या संख्येसोबतच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरतीही काही वर्षांपासून झालेली नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या १२३८ पदांपैकी ५८६ पदांवर कर्मचारी कार्यरत असून, ६५२ पदे रिक्त आहेत. परीक्षा विभाग आणि अनेक शैक्षणिक विभागांमध्ये कर्मचारीच नाहीत. या संपूर्ण परिस्थितीची उच्च व तंत्रशिक्षण विभागाला जाण असतानाही पदभरतीसाठी ठोस कार्यवाही होत नाही ही खरी शोकांतिका आहे. पुणे विद्यापीठाच्या मार्फत पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, बारामती, हवेली, भोर, वेल्हा, मुळशी, खेड, मावळ, जुन्नर, शिरूर असंख्य महाविद्यालयांची कामे त्यामुळे रखडली असून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र नाशिक नगर या परिसरातील शैक्षणिक संस्थांवरही मोठा परिणाम होत आहे.
उच्चशिक्षण संचालनालयही पुण्यातच विभागाचे मंत्री पुण्याचे, तरीही….
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एनआयआरएफ रैंकिंगमध्ये घसरण झाल्यामुळे, अनेकांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे आमदार असून, पुण्यातच राहतात. प्राध्यापक पदभरतीचा केंद्रबिंदू असणारे उच्च शिक्षण संचालनालय हे पुणे स्टेशनजवळ सेंट्रल बिल्डिंगमध्ये आहे. उच्च शिक्षण संचालक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे या कार्यालयातूनच प्राध्यापक किंवा प्राचार्य भरतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतात. असे असतानाही विद्यापीठात प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण न होणे ही मनाला खंत वाटणारी आहे.
या मोजक्याच विभागांत प्राध्यापक –
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ४२ शैक्षणिक विभागांमध्ये प्राध्यापकांची ७० पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ १० प्राध्यापक कार्यरत आहेत. ही बाब अंत्यत खेदजनक आहे. विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी, रसायनशास्त्र, सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् भूगोल, भूगर्भशास्त्र, भौतिकशास्त्र, पॉलिटिक्स अँड पब्लिक अँडमिनिस्ट्रेशन, समाजशास्त्र विभागात प्रत्येकी १, तर वनस्पतीशास्त्र विभागात २ असे एकूण १० प्राध्यापक कार्यरत आहेत.











