संत तुकाराम सहकारी साखर कारखाना बोगस मतदानाचा सुळसुळाट; पराभूत उमेदवार बाळासाहेब भिंताडेची न्यायालयात याचिका

0

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना मर्या. कासारसाई दारुंब्रे ता. मुळशी जि. पुणे संस्थेच्या संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम संबंधित निवडणुकी निर्णय अधिकारी यांच्याकडून केले जात असताना प्रत्यक्ष उस उत्पादक गट क्र.१ हिंजवडी-ताथवडे या मतदार संघातून निवडणूक जाहीर झाल्यानंतरही लोकशाहीची हत्या करण्याचा भीम पराक्रम सत्ताधारी पक्षाकडून केला जात असताना डोळेझाकपणे या सर्व प्रकाराला पाठिंबा देण्याचे कामही राजरोसपणे करण्यात आल्याने प्रत्यक्ष मतदानाच्या दरम्यान बोगस मतदान व मयतांचेही मतदान नोंद झाल्याचा आरोप अपक्ष निवडणूक लढणारे बाळू भिंताडे यांनी केला आहे.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना सार्वत्रिक निवडणूक सन २०२४-२५ ते २०२९-३० या कालावधी जाहीर झाल्यापासून ही निवडणूक एकतर्फी करण्यासाठी सर्वपक्षीय आमदार आणि संस्थापक अध्यक्ष नाना नवले यांनी संपूर्ण सभासदांच्या मनाविरुद्ध मनमानी कारभार करणाऱ्या लोकांची संगत करत ही निवडणूक प्रक्रिया सदोष करण्यास मदत केली. सर्वपक्षीय इच्छुकांची बैठक बोलावत सुमारे 100 लोकांचे उमेदवारी अर्ज एकाच दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त (खाजगी कार्यालयाच्या प्रांगणात) जमा करण्याचे काम केले. त्यावेळी समक्ष तीन ते चार विद्यमान खासदार संस्थापक अध्यक्ष विदुराजी नाना नवले या सर्व लोकांची मूकसंमती होती. त्यानंतरही सभासद हितार्थ काही निवडक मंडळींनी निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांनाही प्रचंड बाहुबली त्रासाला सामोरे जावे लागले काही उमेदवारांना तर रात्री अपरात्री राहत्या घरातून उचलून नेऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. मुळात उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास शासकीय निर्णयाप्रमाणे जी मुदत देण्यात आली होती त्यावेळी सुमारे 70 ते 80 अर्ज बाकी असतानाही संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अंतिम यादी जाहीर न करता यांच्या या भाऊबली कृत्यास पाठिंबा देण्याचे काम केले आहे. मुळात निर्णय प्रक्रिया तटस्थ राबविण्यात आली असती तर दोन पॅनल मध्ये सरळ सरळ लढती शक्य होत्या परंतु सत्ताधारी संचालक मंडळाच्या सोबतीस विद्यमान आमदारांनी आपले मोहरे पॅनलमध्ये दाखल केल्यामुळे अंतिम यादी सुमारे 36 तासानंतर उशिरा जाहीर करण्यात आली. सभासद हितार्थ बंडखोरी झालेली असताना सुद्धा मुख्य प्रचाराच्या दरम्यानही अपघाताने ही निवडणूक लागली आहे असाच अपप्रचार सत्ताधारी संचालक मंडळाकडून करण्यात आला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना एकतर्फी आपल्या ताब्यात हवा असा अतोनात प्रयत्न करूनही सभासदांकडून करवी अपक्ष उमेदवार बाळू भिंताडे यांना वाढता पाठिंबा लक्षात घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सुद्धा ही बोगस मतदान व मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा पराक्रम करण्यात आले आहेत. अपक्ष उमेदवार असलेल्या गट क्रमांक एक वगळता अन्यत्र मतदानाची टक्केवारी कमी राहण्याची शक्यता असताना अचानक खेड तालुक्यांमध्ये अन हवेली तालुक्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मयत मतदारांची ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. ज्या सभासदांच्या घरातील मयत सदस्य अशी नोंद असताना ही त्यांच्या नावे संबंधित मतदान प्रक्रियेमध्ये मतदान करण्यात आले आहे. मतदान केंद्र क्रमांक 25 इंदोरी-अ.  येथे 338 पैकी 299 मतदानाची नोंद झाली आहे त्यामध्ये प्रत्यक्षात मयत असलेल्या मतदारांनीही मतदान केले असल्याचे सिद्ध झाले आहे. तर मतदान केंद्र क्रमांक 26 इंदोरी-ब  येथेही 339 पैकी 178 विक्रमी मतदान नोंद झाले आहे. याबरोबरच 40 मरकळ अ     572 पैकी 333 व 41 मरकळ-ब  येथे 468 पैकी 288 अशी झालेली मतदानाची नोंद बेकायदेशीर मतदान झाल्याच्या आरोपाला पुष्टी देत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात येत आहे. या सर्व प्रकारच्या विरोधात पराभूत उमेदवार बाळू भिंताडे यांनी न्यायालयाचा मार्ग स्वीकारला असून या निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात उद्या याचिका दाखल होणार आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

उमेदवाराला मिळालेली एकूण वैध मते

उस उत्पादक गट क्र. १ हिंजवडी-ताथवडे

नवले विदुराजी विठोबा (८५२४) विजयी

जाधव दत्तात्रय गोपाळ(८३८०) विजयी

भिंताडे बाळु दत्तात्रय (२५०५) पराभूत

भुजबळ चेतन हुशार (७१८९) विजयी एकूण वैध मतपत्रिका ९५१५

 उमेदवाराला मतदान केंद्रानुसार मिळालेली मते-

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार उमेदवाराचे नाव-

ऊस उत्पादक गट क्र 2 पोड-पिरंगुट

ढमाले धैर्यशिल रमेशचंद्र

गायकवाड यशवंत सत्तू

उभे दत्तात्रय शंकरराव

ऊस उत्पादक गट क्र. 3 तळेगाव-वडगाव

दाभाडे ज्ञानेश्वर सावळेराम

भेगडे बापुसो जयवंतराव

काशिद संदिप ज्ञानेश्वर

ऊस उत्पादक गट क्र. ४ सोमाटणे-पवनानगर

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

कडू छबुराव रामचंद्र

लिम्हण भरत मच्छिंद्र

बोडके उमेश बाळू उर्फ बाळासाहेब

ऊस उत्पादक गट क्र.५ खेड-हवेली-शिरुर

लोखंडे अनिल किसन

भोंडवे धोंडिबा तुकाराम

कातोरे विलास रामचंद्र

काळजे अतुल अरुण

महिला राखीव- 

अरगडे ज्योती केशव

वाघोले शोभा गोरक्षनाथ

अनुसूचित जाती/जमाती-  भालेराव लक्ष्मण शंकर

इतर मागासवर्ग-  कुदळे राजेंद्र महादेव

विमुक्त जाती/भटक्या जमाती/विमाप्र-  कोळेकर शिवाजी हरिभाऊ