इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनद्वारे धमकी देणारा तसेच शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकराला अखेर अटक झाली आहे. महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणा राज्यात तो लपून बसला होता. पोलिसांनी त्याला तेथून अटक केली.






प्रशांत कोरटकराचा अटकपूर्व जामीन न्यायायलाने फेटाळल्याने त्याला कधीही अटक होण्याची शक्यता होती. तो परदेश पळून गेल्याच्या देखील चर्चा होत्या. मात्र,त्याच्या पत्नीने त्याचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे स्वाधीन केल्याने तो देशाबाहेर गेला नसल्याचे स्पष्ट झाले होते. आज (सोमवारी) अखेर त्याला तेलंगणातून अटक करण्यात आली.
गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कोरटकरला तेलंगणा राज्यातून अटक केल्याची माहिती समोर येत आहे. 24 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनद्वारे धमकी दिली होती. त्या दिवसांपासून कोरटकर हा फरार होता.
कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून त्याने मध्यंतरी अंतरिम जामीन मिळवला होता. 11 मार्च रोजी अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी अंतरिम जामीन मुदतवाढ अर्ज फेटाळण्यात आला होता. हा अर्ज फेटाळल्यानंतर पुन्हा एकदा कोरटकर हा फरार झाला होता. अखेर आज सोमवारी कोल्हापूर पोलिसांनी त्याच्यावर तेलंगणा राज्यात कारवाई करत अटक केली.
कोल्हापूर पोलिसांना सातत्याने गुंगारा देण्यासाठी त्यांनी तीन दिवसांपूर्वी दुबईतील फोटो शेअर केला होता. त्यामुळे कोरटकर हा दुबईला फरार झाल्याची चर्चा राज्यात सुरू होते. इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत यांनी कोरटकर याचा पासपोर्ट पोलिसांनी जमा करून घ्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर कोरटकर यांच्या पत्नीने त्यांचा पासवर्ड कोल्हापूर पोलिसांकडे सुपूर्द केला होता. कोल्हापूर पोलीस तपासाच्या मागावर असतानाच कोरटकर हा तेलंगणा राज्यात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून कोल्हापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अशी झाली अटक
कोरटकर ला 11 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मिळाल्यानंतर फॉरेन्सिक लॅब मधील तपासणीसाठी आणि आवाजाचे सॅम्पल घेण्यासाठी कोरटकर यांना अटक होणे गरजेचे होते. मात्र अंतरिम जामीन मिळाल्याने कोरडकरला अटक करता येत नव्हती. मात्र तोपर्यंत कोरटकर ज्या वाहनातून तो फिरत होता. त्या वाहनाच्या मार्गावर कोल्हापूर केसांचे एक पथक लक्ष्य ठेवून होते. अखेर अंतरिम जामीनाची मुदत संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळण्याचा अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकर यांनी पहिल्या वाहनाचा ताबा सोडून दुसऱ्या वाहनातून प्रवास सुरू केला. त्यामुळे तपासात अडचणी आल्या. अखेर कोल्हापूर पोलिसांना दुसऱ्या वाहनाचा देखील शोध लागल्याने तेलंगणा येथे जाऊन कोरटकर याच्यावर अटकेची कारवाई केली.










