कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकर याचा गेल्या अनेक दिवसांपासून शोध घेत आहेत. पोलिसांनी नुकतीच कोरटकर याच्या पत्नीची चौकशी केली होती. त्यावेळी तिने प्रशांत कोरटकर हा चंद्रपूरला गेल्याचे सांगितले होते. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचे पथक तातडीने चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, आता याप्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रशांत कोरटकर याने देशाबाहेर पलायन केल्याचे समजत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, प्रशांत कोरटकर हा कोलकाता विमानतळावरुन दुबईला पळून गेल्याची शक्यता आहे. त्याचा दुबईतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जंगजंग पछाडणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. मुंबई उच्च न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला अटकपूर्व जामीन द्यायला नकार दिला होता. त्यामुळे लपतछपत फिरणाऱ्या प्रशांत कोरटकर याने अरबांची दुबई जवळ केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी कोरटकरचा सोशल मिडीयावर व्हायरल होणारा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
कोल्हापूर पोलिसांनी अलीकडेच प्रशांत कोरटकर याची पत्नी, नातेवाईक आणि मित्रांकडे चौकशी केली होती. त्यावेळी प्रशांत कोरटकर याच्या पत्नीने तो चंद्रपूरला गेल्याची माहिती दिली होती. त्यामुळे जुना राजवाडा पोलीस, एलसीबी आणि सायबर शाखेचे पोलीस चंद्रपूरला रवाना झाले होते. मात्र, आता कोरटकर हा दुबईत असल्याची माहिती समोर आल्यावर त्याच्या पत्नीने पोलिसांची दिशाभूल केली का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. प्रशांत कोरटकर हा खरोखरच दुबईत असेल तर त्याला परत आणण्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस काय पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकर याचा गेल्या अनेक दिवसांपासून शोध घेत आहेत. पोलिसांनी नुकतीच कोरटकर याच्या पत्नीची चौकशी केली होती. त्यावेळी तिने प्रशांत कोरटकर हा चंद्रपूरला गेल्याचे सांगितले होते. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचे पथक तातडीने चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, आता याप्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रशांत कोरटकर याने देशाबाहेर पलायन केल्याचे समजत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, प्रशांत कोरटकर हा कोलकाता विमानतळावरुन दुबईला पळून गेल्याची शक्यता आहे. त्याचा दुबईतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जंगजंग पछाडणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. मुंबई उच्च न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला अटकपूर्व जामीन द्यायला नकार दिला होता. त्यामुळे लपतछपत फिरणाऱ्या प्रशांत कोरटकर याने अरबांची दुबई जवळ केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी कोरटकरचा सोशल मिडीयावर व्हायरल होणारा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
कोल्हापूर पोलिसांनी अलीकडेच प्रशांत कोरटकर याची पत्नी, नातेवाईक आणि मित्रांकडे चौकशी केली होती. त्यावेळी प्रशांत कोरटकर याच्या पत्नीने तो चंद्रपूरला गेल्याची माहिती दिली होती. त्यामुळे जुना राजवाडा पोलीस, एलसीबी आणि सायबर शाखेचे पोलीस चंद्रपूरला रवाना झाले होते. मात्र, आता कोरटकर हा दुबईत असल्याची माहिती समोर आल्यावर त्याच्या पत्नीने पोलिसांची दिशाभूल केली का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. प्रशांत कोरटकर हा खरोखरच दुबईत असेल तर त्याला परत आणण्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस काय पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.