बदल्यांचा धडाका सुरुच! ‘या’ 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपूर, संभाजीनगरचे कारभारी बदलले

0

राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यापासून पोलीस प्रशासनामध्ये मोठे बदल केले जात आहेत. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, अत्याचाराच्या वाढत्या घटना तसेच आता नागपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली आहे. अशातच आता राज्याच्या पोलीस यंत्रणेत मोठे बदल करण्यात आले असून 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.

कोणत्या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या?

1. आंचल गोयल (IAS:RR:2014) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त नागपूर यांची मुंबई शहर, मुंबई येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. अंकित (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

3. श्रीमती मीनल करनवाल (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांची जिल्हा परिषद, जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

4 कवली मेघना (IAS:RR:2021) प्रकल्प संचालक, ITDP, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड यांची जिल्हा परिषद, नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. करिश्मा नायर (IAS:RR:2021) प्रकल्प संचालक, ITDP, जव्हार आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर यांची नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6. रणजित मोहन यादव (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, कुरखेडा उपविभाग, गडचिरोली यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली येथे आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट