‘राष्ट्रवादी’च्या आमदाराचे नाव चिठ्ठीत लिहून महिलेने प्यायले विषारी औषध! नवऱ्याला त्रास दिल्याचा चिठ्ठीत उल्लेख

0

आमदाराने आणि त्याच्या आमदाराकडून धमकावण्यात येत असल्याने चिठ्ठीत लिहून महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यात हा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार यांच्यावर आरोप करत महिलेने औषध प्राशन केले. मिळालेल्या माहितीनुसार औषध प्राशन करणारी महिला ही काँग्रेसची पदाधिकारी आहे.

महिलेच्या भावाने आमदार नितीन पवार यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. औषध प्यायलेल्या महिला नवरा ग्रामसेवक असून त्याच्या विरोधात आमदार पवार यांनी विधीमंडळात लक्षवेधी उपस्थित केली होती. त्या लक्षवेधीचा उल्लेखही संबंधित तक्रारदाराकडून करण्यात आल्याचे मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार नितीन पवार व त्यांच्या पत्नी जयश्री पवार या कोणत्या ना कोणत्या कारणाने खोट्या तक्रारी करून ग्रामसेवक असलेल्या पतीस त्रास देतात. म्हणून काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या शीतल महाजन यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येपूर्वी शीतल महाजन यांनी चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे,

निवडणुकीत आमदार पवार आणि त्यांच्या पत्नीविरोधात काम केल्यामुळे आपल्या पतीला अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे शीतल महाजन यांनी म्हटले होते. तसेच पतीची चौकशी करूनही तो दोषी आढळले नाही तरी देखील त्यांना त्रास देत असल्याचे महाजन यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

शीतल महाजन यांचे बंधू योगेश गायकवाड यांनी अभोणा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून आमदारांकडून जाणीवपूर्वक होत असलेल्या त्रासाला कंटाळून शीतल महाजन यांनी विषारी औषध घेऊन स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केल्याचा म्हटले आहे.