संतोष देशमुख प्रकरणात ट्विस्ट, कृष्णा आंधळेचा साथीदार कोण?ओळख पटवल्यानंतर ज्या प्रमाणे बाईक पळवली, त्यानुसार त्याला…

0
2

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृ्ष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून जवळपास 90 दिवसांपासून कृष्णा आंधळे फरार आहे. कृष्णा आंधळेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. या सीसीटीव्ही फूटेजमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची एकच लाट उसळली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. तर, कृष्णा आंधळे हा फरार आहे. कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख हत्याकांडातील नववा आरोपी आहे. सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर कृष्णाने आरोपींच्या मोकारपंती ग्रुपवर व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल केल्याचे समोर आले. आता कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. कृष्णा आंधळेचा घातपात झाल्याची भीती, संशय काही राजकीय नेत्यांनी व्यक्त केला होता.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

संतोष देशमुख हत्या प्रकरण तपासात नवा ट्विस्ट…

समोर आलेल्या माहितीनुसार, एका मोटरसायकलवर कृष्ण आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास दिसल्याचा दावा करण्यात आला. कृष्णा आंधळेने कपाळी टिळा लावला होता. स्थानिकाने हटकल्यानंतर तो दुचाकीवरून पळून गेला असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

कृष्णा आंधळेचा साथीदार कोण?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळे नाशिक मध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. नाशिकमधील गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याचा काही लोकांनी दावा केला आहे. याची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून तपास सुरू केला आहे. कृष्णा आंधळेसोबत असणारा साथीदार कोण, याचीही चर्चा सुरू झाली आहे. कृष्णा आंधळेला हटकल्यानंतर त्याने बाईकवरून पोबारा केला. त्यावेळी कृष्णा आंधळेसोबत असलेला साथीदार हा स्थानिक असल्याची शक्यता आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाशिक कनेक्शन समोर आले होते. त्यामुळे वाल्मिक कराडशी संबंधित कोणीतरी कृष्णाला मदत करत असल्याचा संशय आहे. स्थानिकांनी कृष्णाची ओळख पटवल्यानंतर ज्या प्रमाणे बाईक पळवली, त्यानुसार हा त्याला स्थानिक रस्त्यांची अधिक माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृष्णासोबत आता त्याच्या साथीदाराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ