स्वारगेट बलात्कार प्रकरणात मोठं ट्विस्ट; पीडित तरुणीच्या पदरी निराशाच का? पुणे पोलिसांकडून देण्यात आला नव्या मागणीला नकार 

0

काही दिवसांपूर्वी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली होती. बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात हा प्रकार घडला. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली, पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे, तो पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील गुणा गावचा रहिवाशी आहे. पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे, मात्रा आता पीडितेच्या नव्या मागणीनंतर आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे.

काय आहे पीडितेची मागणी?

स्वारगेट बलात्कार प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्तावर सरकारकडे दाखल झाला आहे. पुणे पोलिसांकडून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र अजय मिसर यांच्या नावाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र आता पीडित तरुणीकडून सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांना नियुक्त करावं अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु पीडित तरुणीने अर्ज देण्यास उशिर केल्याचं स्पष्टीकरण यावर पुणे पोलिसांकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सरकारी वकील कोण असणार? हे पहाणं महत्त्वाचं असणार आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

अशा आवळल्या आरोपीच्या मुसक्या

स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला, त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी तब्बल 13 पोलिसांची पथकं तैनात करण्यात आली होती, तो त्याच्या मुळगावी गुणा येथे लपून बसल्याचा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी आरोपीच्या गावात त्याचा कसून शोध घेतला. त्याची माहिती सांगणाऱ्याला बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं होतं.

अखेर मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आरोपीने पीडितेवर दोनदा बलात्कार केल्याचं वैद्यकीय अहवालामधून समोर आलं आहे. मात्र या प्रकरणात आरोपीच्या कुटुंबीयांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. या प्रकरणात अद्याप तपास सुरू आहे, आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार