चेंबूर दि. ११ (अधिराज्य) प्रत्येक देशाचा कारभार हा त्याच्या सामाजिक, राजकीय प्रगतीवर टिकून असतो त्यामुळे समाजात सामाजिक मूल्यांची जाण असलेले चांगले सामाजिक कार्यकर्ते निर्माण व्हावेत या अनुषंगाने संकल्प संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते त्या सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचा सांगता समारंभ व प्रमाणपत्र वितरण सोहळा पंत वालावलकर स्कुल नेहरू नगर कुर्ला (पू) या ठिकाणी रविवार ९ मार्च २०२५ रोजी मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या संपन्न झाला.
सामाजिक क्षेत्रातील कार्य करीत असलेल्या तसेच समाज कार्य करण्याची आवड असणाऱ्यांसाठी १९ आठवड्याचे सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले होते, या प्रशिक्षणामध्ये समाजकार्य म्हणजे काय ? समाज कार्याचे महत्त्व नेतृत्वगुण, संवादकौशल्य, गटकार्य, प्रचार-प्रसिद्धी माध्यमे, समाज कार्यकर्त्याची भूमिका आणि विविध सामाजिक समस्या अशा विविध विषयांवर ४९ तज्ञ व्यक्ती कडून प्रशिक्षण देण्यात आले. तसेच चार शनिवार विविध संस्था संघटना आणि शासकीय कार्यालयामध्ये शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती सोबतच दोन दिवसीय निवासी शिबिर देखील घेण्यात आले होत त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास व स्वपरिचय याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोक सेवा संगम संचालिका इथेल डिसूझा, सिने नाट्य अभिनेत्री अमृता उत्तरावर, ट्रान्सजेंडर सामाजिक कार्यकर्त्या श्रीदेवी लोंढे, महाराष्ट्र विद्या विकास मंडळ कुर्लाचे सचिव सत्येंद्र जाधव, संकल्प संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष विनोद हिवाळे, कार्यक्रमाचे समन्वयक सविता हेंडवे, वनिता सावंत यांची उपस्थिती लाभली होती.
सदर प्रसंगी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पगुच्छ अर्पण करून स्वागतगीत आणि सामूहिक उद्देशिके चे वाचन करुन कार्यक्रमास प्रारंभ झाला, वनिता सावंत यांनी उपस्थित पाहुण्यांचा अल्पपरिचय देऊन त्यांचे स्वागत केले तर समन्वयक सविता हेंडवे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना फार सरळ मोजक्या शब्दात मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कदम आणि नेहा सावंत यांनी उत्कृष्ट प्रकारे केले. सर्व प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणा दरम्यान आपले अनुभव, काय शिकायला मिळाले काही अडचणी असतांना देखील प्रशिक्षण कसे यशस्वी पूर्ण केले तसेच भविष्यातल्या त्यांच्या वाटचाल कशी असेल मनोगताचा माध्यमातून सांगितले. उपस्थित पाहुण्यांचा हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना त्यांनी १९ आठवड्यांचे सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग यशस्वीरित्या पुर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा हस्ते विशेषता निवासी शिबिरा मध्ये ग्रुप ऍक्टिव्हिटीज च्या माध्यमातून स्पर्धा घेण्यात आल्या होत्या उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
स्वागत अध्यक्ष विनोद हिवाळे यांनी सामाजिक कार्यकर्ता यांचे भूमिका आणि भविष्यातले कार्य कसे असावे याबद्दल मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे यांनी आपल्या भाषणामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देऊन भविष्यासाठी महत्त्वाच्या मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निलोफर शेख यांनी केले. विशेष आभार वर्षाताई विद्या विलास, विद्या पाटेकर डॉ. संतोष कांबळे,आदेश पगारे सुजाता सावंत, स्वप्निल जाधव, सुनीता चिकणे शिवाजी नगर पोलीस स्टेशन, जनजागृती विद्यार्थी संघ,लोकमान्य तिलक सामान्य रुग्णालय सायन, महाराष्ट्र नशा बंदी मंडळ समतोल फाउंडेशन,युसुफ मेहर अली सेंटर,प्रिंटिंग आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया विशेष सहकार्य दिपा गमरे राजेंद्र कांबळे सूर्यकांत चव्हाण यांचे लाभले. सरतेशेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.