डेटा एक्सल कंपनी पुणे यांचेकडून पुणे मनपा शाळा साडेसतरा नळी, हडपसर या शाळेस ६.५० लाख रुपयांचे संपूर्ण इमारत रंगकाम, ५ कपाटे, १३ व्हाईट बोर्ड, १ नोटीस बोर्ड, ५ सतरंज्या, इ. शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्यानिमित्ताने डेटा एक्सल कंपनी पुणे, रोटरी क्लब सिंहगड रोड चॅरिटेबल ट्रस्ट आणि IFRM ३१३१ यांचे संयुक्त सहकार्याने हा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.






उद्घाटन प्रसंगी डेटा एक्सल कंपनीचे पुणे आणि अमेरिकन प्रतिनिधी सुमित भल्ला, विशाल भसीन, जीन मोसेले, ख्रिस्टी मॅक्ग्रथ, मार्क कलीनेन, जेसिका जोन्स, लॉवेल ऑरेलप, ब्रूक ओकीफ, सुनिल मंडलीया, सांथी जनपती, अजर बॅक्सी उपस्थित होते. तसेच मॅनेजिंग डायरेक्टर फेनास ऑटो लि. व सीएसआर समन्वयक रोटरी मा. दिपक महाजन, अध्यक्ष रोटरी क्लब सिंहगड रोड चॅरिटेबल ट्रस्ट मा. अभय देवारे उपस्थित होते. तसेच पुणे महापालिका शिक्षण विभाग प्राथ. उप – प्रशासकीय अधिकारी मा. शुभांगी चव्हाण व मा. शिल्पकला रंधवे, सहा. प्रशा. अधिकारी (क्रीडा) मा. सुनिल ताकवले, पर्यवेक्षिका मा. लिला मोरे, श्रुफिन फौंडेशन सीईओ मा. विजय राठोड व अध्यक्ष, उपशिक्षिका सौ. सविता रासोटे उपस्थित होते. सर्व परदेशी पाहुण्यांचे शाळेतील मुलींच्या लेझीम पथकाने ढोल – ताशाच्या गजरात व औक्षण करून स्वागत केले. पाहुण्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. इ. ३ री च्या मुलींनी स्वागत नृत्य सादर केले. पाहुण्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विशाल भसीन यांनी मुलांना ध्येय साध्य करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्यास सांगितले. डेटा एक्सल कंपनी आणि IFRM ३१३१ यांचे मदतीमुळे शाळेचे रूप बदलण्यास मदत झाली, असे दिपक महाजन यांनी आपल्या भाषणात म्हटले. मा. शुभांगी चव्हाण यांनी शिक्षक, शालेय गुणवत्ता व उपक्रमांचे कौतुक केले व शाळेस सहाय्य करणाऱ्या या संस्थांचे आभार मानले. तसेच सौ. सविता रासोटे म्हणाल्या की, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक हे पितृतुल्य भावनेने कार्यरत आहेत.यानंतर अतिथींच्या हस्ते मुख्य नामफलकाचे व सुसज्ज वर्गखोल्यांचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेश ठोंबरे यांनी केले. सूत्रसंचालन पल्लवी जाधव व आभार प्रदर्शन चैताली देशमुख यांनी केले. सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्योती राठोड, शिक्षक विजय माने, राधिका गोरे, तानाजी सूर्यवंशी, आदिनाथ गोल्हार, विद्या लाळगे, सुनिल चोभे व अस्मिता सुरवसे, शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.











