महाराष्ट्र पुन्हा संतापला! सेन्सॉर बोर्डाचा उर्मटपणा.. ‘कोण आहेत नामदेव ढसाळ?’ प्रखरता सामाजिक संदेश खटकले

0

दलित समाजातील जळजळीत वास्तव ‘गोलपीठा’ या कविता संग्रहातून समाजासमोर आणणारे दलित, गोरगरिबांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दलित पँथरसारख्या चळवळीतून विद्रोहाची तलवार उपसणारे पद्मश्री, विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांचा जीवनावर आधारित ‘चल हल्लाबोल’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील सर्व कविता काढून मगच प्रदर्शित कराव्यात अशी अट निर्मात्यांसमोर ठेवली. इतकंच नाही तर त्यांनी थेट ‘कोण नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही’ असा सवाल नोटीसमध्ये विचारल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

सेन्सॉर बोर्डाला त्यांच्या कवितांतील प्रखरता आणि सामाजिक संदेश खटकले आहेत. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, या कविता काढल्याशिवाय चित्रपटाला परवानगी मिळणार नाही. यावर या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते महेश बनसोडेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, ‘नामदेव ढसाळ यांच्याशिवाय हा चित्रपट अपूर्ण आहे. त्यांच्या कविता हा चित्रपटाचा आत्मा आहेत.’

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य

दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर झाल्याने निर्मात्यांचे आर्थिक नुकसान होत असून, ते याविरुद्ध कायदेशीर लढा देण्याच्या तयारीत आहेत.

सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी रेवणकर आणि सय्यद रबी हश्मी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना याबाबत नोटीस पाठवली होती. त्यात नामदेव ढसाळ कोण आहे, आम्हाला माहीत नाही. त्यांच्या कविता काढल्या तरच चित्रपटाला परवानगी मिळेल असा फतवा काढल्याने दलित समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. UA साठी रिजेक्ट करण्यात आला असून A श्रेणीसाठी सेन्सॉर बोर्डाने अनेक सूचना केल्या आहेत.

सेन्सॉर बोर्डाने नोटीसीत काय म्हटलंय?

वाघ्या-मुरळीचा डान्सला ज्याला आपण लोकनृत्य म्हणतो त्याला काय म्हणतात हे सेन्सॉर बोर्डाला माहीत नव्हतं. नोटीसीत स्टेज डान्स लिहिलं आहे.

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार

मंदिराचे सीन्स काढायला सांगितलं.

हरामखोर शब्द काढून टाकण्याची सूचना

नामदेव ढसाळ्यांच्या कवितेतील शिव्या काढण्याची सूचना

कोण नामदेव ढसाळ, आम्हाला माहीत नाही असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

आता सोशल मीडियावर या निर्णयाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी सेन्सॉर बोर्डावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटल्याचा आरोप केला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास ढसाळ यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचतील, अशी आशा चाहत्यांना आहे. आता सर्वांचे डोळे निर्मात्यांच्या पुढील कारवाईकडे लागले आहेत.