रायगड जिल्ह्यात भाजपने आपला मित्रपक्ष शिवसेनेला जोरदार धक्का दिलाय. शिवसेनेतील नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांना आपल्याकडे ओढण्यात भाजप यशस्वी झाला आहे. आज प्रकाश देसाई यांनी पाली येथील मेळाव्यात आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश करत्यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार विक्रांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. लोकांची कामे करण्यासाठी अपेक्षित ताकद मिळत नव्हती. त्यामुळे भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे प्रकाश देसाई यांनी सांगितलं. तर देसाई यांचा प्रवेश पक्षाला फलदायी ठरेल असं खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितलं.
Home ताज्या बातम्या रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपाचाच ‘दे धक्का’; मोठा नेत्याचा भाजप प्रवेश पक्षाला फलदायी...












