नाशिकमधील श्री.स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचे आज (रविवारी) मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पंकजा मुंडे यांन शहरीकरण आणि नागरीकरण वाढत असताना पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि नद्या पुनर्जीवित करीत पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन यावेळी केले.
पंकजा मुंडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांचा देखील उल्लेख आपल्या भाषणात केला. त्या म्हणाल्या, ‘गोपीनाथ मुंडेंसाहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा एक साठा केला तर वेगळा एक पक्षच उभा राहील. गोपीनाथ मुंडेसाहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची येवढी मोठी संख्या आहे.’
‘मुंडेंसाहेबांवर प्रेम करणारे आणि माझ्याबरोबर जोडले गेलेले लोक हे केवळ मी मुंडेंसाहेबांची मुलगी म्हणून माझ्यासोबत जोडले जाऊ शकले नसते. लोक गुणाचा वारसा स्वीकारतात. लोकं मुंडेसाहेबांच्या गुणांवर प्रेम करतात म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा पक्ष उभाच आहे. मुंडेसाहेबांनी भाजपच्या जन्मापासून काम केले आहे तो उभा केला आहे.’, असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.
मुंडेंचा कार्यक्रमाला हजेरी चर्चांना उधाण
दिंडोरीमधील स्वामी समर्थ केंद्रात संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे लपल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला होता. विष्ण चाटे अद्यापही फरार आहेत. त्यातच पंकजा मुंडे यांनी नाशिकच्या दौऱ्यात स्वामी समर्थ केंडरच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.