प्रजासत्ताक दिन शिवडीमध्ये ७५ वा अमृतमहोत्सवी मोठ्या उत्साहात संपन्न

0

शिवडी दि. २६ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समिती मध्यवर्ती मंडळ, शिवडी गटक्रमांक १३ संलग्न सर्व शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय प्रजासत्ताक दिनाचा अमृतमहोत्सवी वर्ष विभागाचे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी धार्मिक विधी आदर्श बौद्धाचार्य प्रवीण तांबे, नरेश सकपाळे, मंगेश पवार, गौतम तांबे यांनी सुमधुर वाणीने पार पाडला, तद्नंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार व पुष्पसुमने अर्पण करण्यात आली, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश सकपाळे यांनी आपल्या कणखर आवाजात अत्यंत प्रभावीपणे केले.

सदर प्रसंगी विभागचे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, समाजभूषण पुरस्कार विजेते भगवान साळवी, कार्याध्यक्ष संतोष जाधव या मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजावंदन करून संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. सदर प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष व समाजभूषण भगवान साळवी, कार्याध्यक्ष संतोष जाधव, प्रवीण तांबे, आदी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित करीत शुभेच्छापर आपले विचार व्यक्त करून सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास श्रीधर मोरे, अनंत मोहिते, प्रकाश तांबे, मंगेश जाधव, दर्शन जाधव, प्रवीण तांबे, वायंगणकर, जगन्नाथ जाधव, कांबळे, नरेश सपकाळे, अशोक कदम, राजाभाऊ शेळके, नरे, बगाडे, कार्यकारिणी मंडळ, पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आदींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान समितीत सामील करून घेण्यापासून ते त्यांनी दोन वर्षे, अकरा महिने, सतरा दिवस दिवसाची रात्र व रक्ताचं पाणी करून भारतीय संविधान लिहिण्यासाठी घेतलेली अथक मेहनत यावर प्रकाश टाकला, अनेकजण म्हणतात संविधान समितीत इतके इतके सभासद होते तर सविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचेच नाव का ? हा समाजातील गैरसमज खोडून काढत कश्याप्रकारे इतर सभासद कामाला बदल देत उपस्थित राहिले नाही, कोणी बाहेरगावी गेले, कोणी आजारपणाचा बहाणा पुढे केला, कोणी गैरहजर राहिले व सर्व भार बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या खांद्यावर घेत कोणीचीही मदत न घेता बाबासाहेबांनी दोन वर्षे, अकरा महिने आणि सतरा दिवसात एकहाती संविधान तयार केले, संविधानाची निर्मिती प्रक्रिया ९ डिसेंबर १९४६ रोजी सुरू झाली आणि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ते पूर्ण झाले व २६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधान लागू झाले त्या दिनाला प्रजासत्ताक दिन म्हटले जाते, जगात अनेक देश लोकशाही, हुकूमशाही, धार्मिक सत्ता यावर चालतात ते देश कोण्या एका धर्माच्या अंमलाखाली आहेत परंतु जगात भारत हाच एक देश आहे जो विविध धर्म, पंथ, जाती, प्रदेश यात विभागला गेला आहे तरी या सर्वांना एका समता, बंधुता, मानवतेच्या धाग्यात बांधून एकसंघ ठेवण्याचे काम भारतीय संविधान करीत आहे, देशातील उच्च-नीच, गरीब-श्रीमंत सर्वच नागरिकांना जात, धर्म, पंथ, वर्ण, लिंग, व्यंग, अर्थ असा कोणताही भेदभाव न ठेवता समान अधिकार भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिले आहेत, त्या संविधान व प्रजासत्ताक दिनाचे ७५ वे अमृतमहोत्सवी वर्षे बौद्धजन पंचायत समिती, शिवडी विभाग, गटक्रमांक १३ च्या वतीने आपण सादर करतोय, तसेच प्रजासत्ताक दिन चिरायू होवो व ही परंपरा अशीच कायम राहो” असे नमुद केले. सरतेशेवटी प्रजासत्ताक दिन चिरायू होवो अशा घोषणा देत राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा