‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष’ आता रुग्णांना जिल्ह्यातच मदत मिळेल! या कार्यालयात सुरू होणार

0

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून राज्यातील अनेक रुग्णांना मदत होत असते. यामुळे आता लोकांना लगेच मदत मिळावी यासाठी आता प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ कक्ष सुरू करण्यात येणार आहे. याबाबत आता २२ जानेवारी रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आर्थिक सहाय्य देण्याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. आता जिल्ह्यातच कक्ष होणार असल्याने मंत्रालयात येण्याची गरज नसणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात मिळणार आहे. यामुळे रुग्णांच्या कुटुबीयांचा त्रास कमी होणार आहे. कुटुबीयांचा पैसा, जास्तीचा वेळ वाया जाणार नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष अधिक सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक वाचा  अजित पवार गटातही नाराजीनाट्य; पुण्यातील बडा नेता राजीनामा देणार? 

गेल्या काही वर्षापासून राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू आहे. या कक्षाच्या माध्यमातून राज्यातील गरजू रुग्णांना मदत दिली जाते. दरम्यान, आता महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी राज्यभराचून अर्ज दाखल होत असतात. मंत्रालयातील “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा” कडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना संबंधित रुग्णालयामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात. आता जिल्ह्यातच ही सुविधा सुरू झाल्यानंतर अनेक लोकांना याचा फायदा होणार आहे.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार