प्रतीक्षा संपली! लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट

0

ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी आर्थिक मदत म्हणून सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्यावर्षी जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आतापर्यंत डिसेंबरपर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. जानेवारीचे पैसे देखील लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.

जानेवारीचे पैसे कधी मिळणार?

जानेवारीचे पैसे कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. लाभार्थी महिलांना डिसेंबरच्या पैशांचा लाभ मिळाला आहे. जानेवारीचे पैसे देखील येत्या 26 जानेवारीच्या आधी लाडक्या बहिणींना मिळतील अशी माहिती याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होतील असं देखील त्या म्हणाल्या आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी देण्यात आलं होतं. त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मोठी अपडेट दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ?

लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांप्रमाणे पैसे येतील असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील महिलांना जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आम्ही लवकरच पूर्ण करू, या योजनेमुळेच महिलांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळून दिलं आहे. त्यामुळे लवकरच आता त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला 2100 रुपयांप्रमाणे पैसे येतील असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

दरम्यान यावर बोलताना गुरुवारी मंत्री आदिती तटकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आगामी अर्थसंकल्पामध्ये आणि त्यानंतरच्या काळात याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.