देशभरात काँग्रेसचा पराभव का होतो? तिकडे काय संजय राऊत आहे का?; राऊत यांचा विजय वडेट्टीवार यांना खोचक सवाल

0

महाविकास आघाडीत गेल्या दोन दिवसांपासून खटक्यामागून खटके उडत आहेत. तीनही पक्षांचे नेते तीन दिशेला तोंड करून आहेत. आता ते एकमेकांना पाठ दाखवतात की पुन्हा सूर जुळवून घेतात, याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. त्यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे गटाचे शिलेदार संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगल्याने महाविकास आघाडीतील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे. मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस नेत्यांन स्वबळाचा नारा दिला आहे. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीचे राजकारण वेगळे असते. तिथली समीकरणंही वेगळी असतात. पण या निवडणुकी आडून नेते उणेदुणे काढत असल्याने सत्ताधाऱ्यांचे मात्र मनोरंजन होत आहे. आता संजय राऊतांनी पुन्हा विजय वडेट्टीवारांना चिमटा काढला आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

ते देवेंद्र फडणवीस कसे ठरवतील?

कोण कुठे जाणार आणि कोण कुठे नाही जाणार हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस ठरवू शकत नाही, असे संजय राऊत म्हणाले. आपआपल्या पक्षाची एक भूमिका असते, विचारधारा असते, तुम्ही आमची पार्टी ज्या पद्धतीने तोडली ते कोणत्या आयडॉलॉजी आहे. राजकारणात आम्ही कुणाशी दुश्मनी करत नाही, असे ते म्हणाले.

एजन्सीचा गैरवापर करण्याची सुरुवात भाजप सरकारमध्ये आल्यापासून सुरू झालं. राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकलं. ही परंपरा तोडत असाल तर स्वागत करू. पण राजकारणात युद्ध सुरूच राहील. जोपर्यंत हुकूमशाही आणि भ्रष्टाचार करत राहाल तोपर्यंत आम्ही लढत राहू, असा इशारा त्यांनी दिला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

वडेट्टीवारांवर घणाघात

यावेळी त्यांनी वडेट्टीवार यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. हरयाणात आम्ही होतो का. काँग्रेससोबत कोणी नव्हतं. हरयाणात का हरला. जम्मू काश्मीरला का हरलात, असा खोचक सवाल त्यांनी विचारला. महाराष्ट्रात काही लोक मुख्यमंत्रीपदाचा कोट शिवून बसले होते. आम्ही नव्हतो. पश्चिम बंगालला शिवसेना होती का. अख्ख्या देशभरात तुमचा पराभव का होतो. सर्वत्र आम्ही आहोत का. संजय राऊत आहे का. वडेट्टीवार त्या बैठकांना होते. आघाडीत समन्वय आणि तडजोडीची भूमिका घ्यावी लागते. जे भूमिका स्वीकारत नाही त्यांना आघाडीत राहण्याचा अधिकार नाही, असे थेट इशारा त्यांनी दिला.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

स्वबळाची आरोळी

यावेळी संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्वबळाची आरोळी ठोकली. मुंबईसह नागपूरपर्यंत सांगेल. आम्ही स्वबळावर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला अजमवायचे आहे. उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले. आमचं ठरतंय की मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीत लोकसभा आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसत असतो. स्वबळावर लढून पक्ष मजबूत करायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.