24 निवडणुकांचे बिगुल उद्या वाजण्याची शक्यता; स्थानिक गट टिकवण्यास नेत्यांची पुन्हा परीक्षा

0

कोरोना महामारीनंतर सगळीच झालेल्या निवडणुकीला पुन्हा तीन वेळा स्थगिती मिळाल्यानंतर जिल्ह्यातील रखडलेल्या सहकारी संस्थेच्या निवडणुका कधीच जाहीर होणार, याकडे सहकारी क्षेत्राचे लक्ष लागून राहिलं होते. मात्र उद्या या सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा नारळ फुटण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ‘ब’, ‘क’,’ड’ प्रवर्गातील रखडलेल्या आणि नव्याने जाहीर होणाऱ्या 873 सहकारी संस्थांची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. उद्या हातकणंगले आणि इचलकरंजी भागातील छोट्या सहकारी संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. यामध्ये 24 यंत्रमाग संस्थाच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता नेत्यांची परीक्षा या सहकारी संस्थांच्या निवडणुकीत असणार आहे. राजकारणातील पाया हा सहकारात रुजवला जातो. अशावेळी सहकारात स्थानिक गट महत्वाचा असतो. हाच गट टिकवून ठेवण्यासाठी आता नेत्यांची खरी कसोटी लागणार आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

कोरोना महामारीनंतर आणि त्यानंतर लोकसभा पावसाळा आणि विधानसभा निवडणूक अशा विविध कारणांनी तीन वेळा या सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. जवळपास 400 पेक्षा अधिक या सहकारी संस्थेच्या निवडणूक प्रलंबित होत्या. तर न्यायालयीन निर्णयाव्यतिरिक्त अन्य काही संस्थांचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले होते, तरीही निवडणुकांना स्थगिती मिळाल्यामुळे सर्वच प्रक्रिया जैसे-थे राहिली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर 31 डिसेंबरला स्थगिती मिळाली होती. मात्र 31 डिसेंबरनंतर हा कालावधी संपल्याने या निवडणुका कधी लागणार याकडे सहकार क्षेत्राला उत्सुकता होती. नव्या वर्षात या अध्यादेशाची तारीख संपल्यानंतर 3 जानेवारी रोजी नवीन अध्यादेश जारी करण्यात आला आहे. निवडणूक घेण्याचा अध्यादेश निघाल्यानंतर सहकारी संस्थांमध्ये धावाधाव सुरू झाली आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

इचलकरंजी, हातकणंगले परिसरातील काही छोट्या, पण सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या 24 निवडणुकांचे बिगुल उद्या वाजण्याची शक्यता आहे. तर येत्या वर्षभरात जिल्ह्यातील एकूण 873 संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. जिल्ह्यातील एकूण 559 संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती होती. 314 संस्थांना निवडणुका नव्याने घ्यावा लागणार आहेत. अशा एकूण 873 संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा आता उडण्यास सुरवात होणार आहे.