‘माझ्या अब्रुची…’ चहलसोबत घटस्फोटाच्या अफवा उडत असताना अखेर चहलची पत्नी धनश्री वर्मा भडकली, म्हणाली..

0
1

क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे जोडपं सध्या खूपच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक चर्चा रंगत आहेत. सोशल मीडियावर तर या दोघांमध्ये दूरावा निर्माण झाला असून लवकरच घटस्फोट घेतील असाही दावा केला जात आहे. मात्र या सर्व बातम्या निरर्थक असल्याचं वारंवार समोर आलं आहे. कारण दोघांनीही अजून यावर अधिकृत असं काही भाष्य केलेलं नाही. मात्र सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलिंगमुळे धनश्री वर्मा चांगलीच संतापली आहे. सोशल मीडियावरील चर्चा पाहून तिचे थेट चारित्र्य हनन झाल्याचा आरोप केला आहे. 8 जानेवारीला धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक वक्तव्य पोस्ट केलं आहे. धनश्रीने गेले काही दिवस कुटुंबासाठी त्रासदायक गेल्याचा उल्लेख केला आहे. तसेच नात्याबाबत सोशल मिडिया आणि वेगवेगळ्या मिडिया रिपोर्टवर निराशा व्यक्त केली आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

धनश्री वर्माने लिहिलं की, ‘निरर्थक बातम्यांनी गेल्या काही दिवसांपासून खूप त्रास दिला आहे. यात कोणतेही तथ्य न तपासता आणि विना चेहऱ्याचे ट्रोल्स, जे द्वेष पसरवून माझ्या अब्रुची हत्या करण्याचा प्रय्तन करत आहेत.’ काही ट्रोलर्संनी चहलच्या लोकप्रियतेचा वापर केल्याचा आरोप धनश्रीवर केला आहे. या आरोपांमुळे धनश्री आणखीच संतापली आहे. तसेच त्या ट्रोल्सला तिने आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. ‘मी माझं नाव आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी इतकी वर्षे कठोर मेहनत घेतली आहे. माझं मौन ही माझी कमकुवत बाजू नसून ती ताकद आहे. नकारात्मकचा ऑनलाईन सहज पसरवता येते. पण दुसऱ्यांना वर आणण्यासाठी हिम्मत आणि उदारता असावी लागते.’

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

विशेष म्हणजे धनश्री वर्माने युझवेंद्र चहलचा या पोस्टमध्ये कुठेच उल्लेख केलेला नाही. इतकंच काय तर तिने या पोस्ट घटस्फोटाच्या बातम्यांचं कुठेच खंडन किंवा पुष्टी केलेली नाही. पण खरं काय ते टिकून राहील असं मात्र अधोरेखित केलं आहे. धनश्रीने लिहिलं की, ‘मी माझ्या खरेपणावर लक्ष केंद्रित करणे आणि माझ्या मूल्यांसह पुढे जाणे निवडले आहे. कोणतेही पुरावे नसतानाही सत्य आपल्या जागी ठामपणे उभे असते. ओम नमः शिवाय.’

धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल यांची लॉकडाऊनमध्ये भेट झाली होती. या दोघांनी 2020 मध्ये लग्न केलं. धनश्री डॉक्टर असून डान्स क्लास चालवते. तिथे तिचा संपर्क चहलशी झाला होता. येथेच दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि ऑगस्टमध्ये दोघांनी साखरपुडा केला. याच वर्षी डिसेंबरमध्ये लग्न केलं. नुकतंच दोघांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली. पण दोघांपैकी एकानेही सोशल मीडियावर पोस्ट केली नाही.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार