‘…त्यामुळे या चुका सुधारायला हव्या’; सामना गमावल्यानंतरही चेहऱ्यावर स्मितहास्य कायम, हार्दिक काय म्हणाला?

0

राजस्थान रॉयल्स (RR) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात झालेल्या सामन्यान राजस्थानने 9 गड्यांनी विजय मिळवला. संदीप शर्माचे 5 बळी आणि यशस्वी जैस्वालचे नाबाद शतक राजस्थानच्या विजयात महत्वाचे ठरले. राजस्थानने या विजयासह आयपीएली प्ले ऑफच्या फेरीचं स्थान जवळपास निश्चित केलं आहे.

मुंबईला राजस्थानने संदीप शर्माच्या भेदकतेच्या जोरावर 20 षटकांत 9 बाद 179 धावांवर रोखले. हे लक्ष्य राजस्थानने 18.4 षटकांत 1 बाद 183 धावा करून पार केले. यशस्वी-जॉस बटलर यांनी 48 चेंडूंत 74 धावांची सलामी दिल्यानंतर यशस्वीने कर्णधार संजू सॅमसनसोबत 65 चेंडूंत नाबाद 109 धावांची भागीदारी करत संघाचा विजय स्पष्ट केला. सुमार गोलंदाजीसह गचाळ क्षेत्ररक्षणाचा मुंबईला फटका बसला. निर्णायक क्षणी मुंबईकरांनी दोन सोपे झेल सोडले.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

हार्दिक पांड्या काय म्हणाला? (Hardik Pandya)

सामन्याचा सुरुवातीलाच आम्ही स्वत:ला अडचणीत आणले. तिलक वर्मा आणि नेहाल वढेरा यांनी चांगली फलंदाजी केली. शेवटच्या षटकांत आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. त्यामुळे 10 ते 15 धावा कमी पडल्या. गोलंदाजी करताना आम्हाला स्टम्पवर मारा करायला हवा होता. पॉवरप्लेमध्ये देखील आम्ही खूप धावा दिल्या. आज क्षेत्ररक्षणातही आमचा दिवस नव्हता. प्रत्येकाला त्यांची जबाबदारी माहिती आहे, त्यामुळे या चुका सुधारायला हव्या आणि त्या पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. मला संघात सतत बदल करणे अजिबात आवडत नाही, मला खेळाडूंच्या पाठीशी राहायला आवडते. चांगलं क्रिकेट खेळणे हेच आमचे लक्ष्य आहे, असं हार्दिक पांड्याने सांगितले. हे सर्व बोलताना हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य काही कमी झाले नाही.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर

मुंबई इंडियन्सची गोलंदाजी विस्कळीत-

पावसानंतर पुन्हा सामना सुरू झाला तेव्हा मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना अधिकच फटका बसू लागला. मुंबईसाठी एकमेव विकेट पियुष चावलाने घेतली, ज्याने 4 षटकांत 33 धावा दिल्या. या सामन्यातून नुवान तुषाराने आयपीएलमध्ये पदार्पण केले, मात्र त्याने अवघ्या 3 षटकात 28 धावा दिल्या. हार्दिक पांड्या देखील एकही विकेट घेऊ शकला नाही. जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी यांची धारदार गोलंदाजीही यावेळी मुंबईसाठी फार काही करू शकली नाही.