ठाकरेंची सेना पुणे शहरात अधिक कमकुवत शिवसैनिकांचा जय महाराष्ट्र! भाजपचा पर्याय निवडण्याचे हे मोठं कारण…!

0
1

पुण्यात शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोठा धक्का बसला आहे. आज पुण्यातील ५ माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या कार्यलयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, प्राची आल्हाट, पल्लवी जावळे, संगीता ठोसर यांनी ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

ठाकरेंची सेना सोडल्यानंतर या माजी नगरसेवकांना शिंदेंच्या सेनेमध्ये घेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र तो पर्याय झुगारून या माजी नगरसेवकांनी भाजपची वाट धरली आहे. मात्र, कट्टर शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत (शिंदे गट) न जाता भाजपची वाट का निवडली याची चर्चा आता शहरात सुरु आहे.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

पुणे शहरात दोन्हीही शिवसेनेची परिस्थिती ही काही फार बरी नाही. जेव्हा शिवसेनेत फूट पडली होती तेव्हा ठाकरेंसोबत १० पैकी ९ नगरसेवक होते तर शिंदे सोबत फक्त १ नगरसेवक गेले होते. पुढे ठाकरेंच्या ९ पैकी अविनाश साळवे हे विधासभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले होते. त्यामुळे फक्त ८ नगरसेवक हे ठाकरेंच्या सेनेत होते. आता त्यातील पाच नगरसेवकांनी ठाकरेंना सोडलं आहे. त्यामुळे ठाकरेंची सेना पुणे शहरात अधिकच कमकुवत झाल्याचे चित्र आहे.

पक्षांतर करण्यापूर्वी या माजी नगरसेवकांनी जाणले की शिंदेंच्या शिवसेनेचा एककलमी कार्यक्रम म्हणजे उद्धव ठाकरे यांना नावे ठेवण्याचा व त्यांच्यावर टीका करण्याचा आहे. त्यामुळे इतके वर्ष ज्या पक्षांमध्ये राहिलो त्यांच्यावर टीका टाळण्याच्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक भाजपची निवड केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील कामगिरी पाहता आगामी महापालिका निवडणुकीत पुणे शहरामध्ये भाजपची ताकद जास्त असण्याची शक्यता आहे. तसेच भाजपचे स्थानिक नेते पुणे महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले असून निवडणुका स्वबळावर लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक होणे हे अधिक फायदेशीर असल्याचे बोलले जात आहे. त्यासोबतच शहरात भाजपाचा खासदार आणि केंद्रीय मंत्री आहे आणि दोन मंत्र्यांसह भाजपचे सहा आमदार देखील आहेत. त्यामुळे आगामी काळात निधी मिळणे आणि कामे मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून भाजप हा उत्तम पर्याय वाटल्याने या सर्व नगरसेवकांनी शिंदे यांची शिवसेनेचा पर्याय जुगारून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!