राहुल गांधींचा दौऱ्यावर आरोपांच्या फैरी, परभणी प्रकरण आता कोणत्या दिशेने चालंलय?

0

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशींच्या कोठडीतल्या मृत्यूनंतर आता राजकारण बरंच तापलंय.राहूल गांधी यांनी सुर्यवंशी कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय. आणि सरकारवर आरोपांचा भडीमार केला.गांधींच्या या दौऱ्यावर सत्ताधाऱ्यांनी सडकून टीका केली.परभणी प्रकरण कोणत्या दिशेने चालंलय? जाणून घेऊया.

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतल्या मृत्यूवरुन आता आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. गेले 12 दिवस हा विषय राज्यभरात चर्चिला जातोय.शरद पवारांसह अनेक महत्वाच्या नेत्यांनी कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी भेट घेतली.या भेटीनंतर गांधींनी आरएसएस, भाजप सरकार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभार आरोप केलेत.दलित असल्यामुळेच सोमनाथ यांची हत्या केल्याच गांधी म्हणाले.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

आम्हाला मदत नको, न्याय हवा.यातील दोषींना फाशी द्यावी अशी मागणी आपण राहुल गांधींकडे केल्याची माहीती सोमनाथ कुटुंबीयांनी दिलीये.दरम्यान राहुल गांधींचा हा दौरा, राजकीय हेतूने प्रेरित असून नौटंकी असल्याची टीका मुख्यमंत्र्यांसह, मंत्री संजय शिरसाट यांनी केलीये.

परभणीत संविधानाच्या विटंबनेमुळे आंदोलन झालं.पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतलं.त्यावेळी ताब्यात असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला.त्यानंतर भीम अनुयायी आक्रमक झाले.कारवाईच्या मागणीसाठी फक्त परभणीचं नाही तर राज्यभरात आंदोलनं झाली.विधीमंडळात देखील मुख्यमंत्र्यांनी मदतीसह कारवाईची घोषणा केली.तरीही प्रकरण काही थंड झालं नाही.राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचा मुद्दा देशभर गाजण्याचे संकेत मिळू लागलेत.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळणार का?

याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर टीका करत, लोकांना न्याय मिळत नाही, सरकार करतंय काय असा सवाल उपस्थित केला. तर परभणीची घटना अतिशय निंदनीय आहे. हा एक सुनियोजित कट होता, त्याची चौकशी झालीच पाहिजे.जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ करा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. परभणी प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनीही सरकारवर ताशेरे ओढले.सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस मारहाणीत झालाय, याचा तपास व्हावा असं सुषमा अंधारे म्हणाल्या. राज्यभरात ठिकठिकाणी भीम अनुयायांनी आंदोलन करत सरकारला जाब विचारलाय.पोलिसी बळाचा वापर करत मारल्याचा आरोप होतोय.आता राजकीय पक्ष आणि नेतेही पुढे सरसावलेत.त्यामुळे कारवाईचा वेग वाढेल, हिच अपेक्षा.परभणी घटनेवरून विरोधक आक्रमक झालेत. आरोपींवर कारवाई करण्यासाठी विरोधकांनी विधानभवनाच्या पाय-यावर आंदोलन केलं. त्यानंतर विधानसभेतही गोंधळ झाला. विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. बीड, परभणी घटनेवरून सरकार गंभीर नाही, असा आरोप करत विरोधकांचा सभात्याग केलाय.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!