नव्या वर्षापासून उत्तर भारतात हाडं गोठवणारी थंडी सुरु होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या आठवड्याच्या २६ डिसेंबरपासून पश्चिम हिमालय क्षेत्र आणि मैदानी भागात वातावरणात मोठा बदल होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच २८ डिसेंबरपर्यंत अरबी समुद्रासहित बंगालच्या खाडीपरिसरात परिणाम पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर २७ ते २९ डिसेंबर दरम्यान पश्चिम हिमालयाच्या भागात तुरळक पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागात बर्फवृष्टीबरोबर शीतलहरी वाहणार आहेत.
भारतीय हवामान विभागानुसार, २७ डिंसेबर आणि २८ डिसेंबर रोजी उत्तर भारतातील मैदानी भाग, डोंगराळ भागात वातावरण खराब पाहायला मिळणार आहे. २७ डिसेंबर रोजी पंजाब, हरियाणा , चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, २७ डिसेंबर रोजी उत्तर-पश्चिम भारत आणि आसपासच्या मध्य भारतातील मैदानी भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर २६-२८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशच्या काही भागात २३-२६ डिसेंबर रोजी शीतलहरमुळे वातावरणात गारठा जाणवण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगित, बाल्टिस्तान, मुजफ्फराबादमधील वेगवेगळ्या भागात २४-२६ डिसेंबरपर्यंत शीतलहरी जाणवणार आहेत.
काश्मीरच्या खोऱ्यात हिवाळ्याचं वातावरण सुरु झालं आहे. हवामान विभागाने सोमवारी संपूर्ण घाटात तीव्र शीतलहरी जाणवणार आहेत. वातावरणातील किमान तापमान शून्य डिग्रीपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांनी हवामान विभागने जारी केलेल्या सूचनांचं पालन करण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे श्रीनगरमध्ये रविवारी किमान तापमान शून्य ते ३.६ डिग्री सेल्सियसपर्यंत नोंदवला गेला. कालच्या रात्रीपासून तापमान ४ डिग्रीहून अधिक होतं. दक्षिण कश्मीरमध्ये वार्षिक अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर किमान तापमान शून्य ते पाच डिग्री सेल्सियसपर्यंत नोंदवलं होतं. मात्र, आता रातोरात बदलताना दिसत आहे.