तिसऱ्या मॅचमध्ये पावसाचा विजय, गाबा कसोटी ड्रॉ, टीम इंडिया सामना बचावण्यात यशस्वी

0
1

रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा ड्रॉ झाला आहे. सामन्यातील पाचव्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे काही वेळ प्रतिक्षा केल्यानंतर दोन्ही संघांच्या संमतीने इथेच थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशाप्रकारे हा सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे आता या 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेझलवूड.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी.