आर अश्विन याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, टीम इंडियाला धक्का

0
1

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अनुभवी आणि दिग्गज ऑलराउंडर आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. अश्विनने आंतराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. अश्विनने मालिकेदरम्यान एकाएकी घेतलेल्या या निर्णयामुळे टीम इंडियाला आणि क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला आहे. अश्विनच्या या निर्णयासह त्याच्या 13 वर्षीय क्रिकेट कारकीर्दीचा अंत झाला आहे. टीम इंडियसाठी गेली अनेक वर्ष सेवा करणाऱ्या या दिग्गज खेळाडूला निरोपही देता न आल्याची खंत यामुळे व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

अश्विनची कसोटी कारकीर्द

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ॲडलेडमध्ये झालेला दुसरा कसोटी सामना हा अश्विनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरला. आर अश्विन याने 6 नोव्हेंबर 2011 रोजी विंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. अश्विनने या दरम्यान एकूण 106 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. अश्विनने या दरम्यान 200 डावांमध्ये 537 विकेट्स घेतल्या. अश्विनने 37 वेळा 5 आणि 8 वेळा 10 विकेट्स घेतल्या. तसेच अश्विनने 151 डावांमध्ये बॅटिंग करताना 6 शतकं आणि 14 अर्धशतकांसह 3 हजार 503 धावा केल्या. अश्विनची 124 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. अश्विनने या दरम्यान 23 षटकार आणि 399 चौकार ठोकले.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेझलवूड.

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी.