राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 15 डिसेंबरला झाला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेलं नाही. परंतु महायुती सरकारचं खातेवाटप ठरल्याची माहिती समोर आली आहे. येत्या 24 तासांत खातेवाटपसंबंधी निर्णय होणार आहे. शिवसेनेची यादी काल रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची यादी आज दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांत राज्यपालांना देणार संपूर्ण खाते वाटपाची यादी देणार आहे.
कसे असेल खातेवाटप?
गेल्या मंत्री मंडळातील महत्वाची खाती त्या-त्या पक्षाकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. गृह भाजपकडे, तर नगरविकास खातं शिवसेनेकडे राहणार आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळणार आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा भाजपच्या ताब्यात राहणार आहे. तर शिवसेनेचे उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला जाणार दिलं आहे. महत्वाचं म्हणजे भाजपच्या वाटेचे गृहनिर्माण खातं शिवसेनेच्या ताब्यात जाणार आहे. महिला व बालविकास देखील राष्ट्रवादीकडेच राहणार आहे, अदिती तटकरेंची पुन्हा या मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा भाजपच्या ताब्यात-
अखेर महायुती सरकारच्या खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झालंय. शिवसेनेची यादी काल रात्रीच मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. राष्ट्रवादीची यादीही आज मुख्यमंत्री फडणवीसांना दिली जाईल. मुख्यमंत्री फडणवीस आज राज्यपालांना संपूर्ण खातेवाटपाची यादी कशी असेल ते देणार आहेत. गेल्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती त्या त्या पक्षाकडेच राहणार आहेत अशी माहिती मिळतेय. गृह खातं भाजपकडे तर नगरविकास खातं शिवसेनेकडे राहणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळेल अशी सूत्रांची माहिती आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा भाजपच्या ताब्यात राहणार आहे अशी माहिती एबीपी माझाला मिळालीय. शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला दिलं जाईल, तर भाजपचं गृहनिर्माण शिवसेनेकडे जाईल असं सांगितलं जातंय. महिला आणि बालविकास राष्ट्रवादीकडेच राहील आणि त्यावर आदिती तटकरेंची वर्णी लागेल अशी शक्यता आहे.
मंत्रिपदाची शपथ घेणारे मंत्री- (कॅबिनेटमंत्री)
1.चंद्रशेखर बावनकुळे
2. राधाकृष्ण विखेपाटील
3. हसन मुश्रीफ
4. चंद्रकांत पाटील
5. गिरीश महाजन
6. गुलाबराव पाटील
7. गणेश नाईक
8. दादा भुसे
9. संजय राठोड
10. धनंजय मुंडे
11. मंगलप्रभात लोढा
12. उदय सामंत
13. जयकुमार रावळ
14. पंकजा मुंडे
15. अतुल सावे
16. अशोक उईके
17. शंभूराज देसाई
18. आशिष शेलार
19. दत्ता भरणे
20. आदिती तटकरे
21. शिवेंद्रसिंह भोसले
22. माणिकराव कोकाटे
23. जयकुमार गोरे
24. नरहरी झिरवळ
25. संजय सावकारे
26. संजय शिरसाठ
27. प्रताप सरनाईक
28. भरत गोगावले
29. मकरंद पाटील
30. नितेश राणे
31. आकाश फुंडकर
32. बाबासाहेब पाटील
33. प्रकाश आबिटकर
राज्यमंत्री
1. माधुरी मिसाळ
2. आशिष जयस्वाल
3. पंकज भोयर
4. मेघना बोर्डीकर साकोरे
5. इंद्रनील नाईक
6. योगेश कदम