भारतीय संगीतसृष्टीतील तालवाद्याचा जादूगार काळाच्या पडद्याआड, झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर शोक व्यक्त

0

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्यांची झुंज अपयशी ठरली असून त्यांची प्राणज्योत मालवली आहे. झाकीर हुसैन यांच्या जाण्यानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे यांनी झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच गायक महेश काळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

दातृत्व हरपलं – महेश काळे

गायक महेश काळे यांनी एबीपी माझसोबत बोलताना म्हटलं की, सुन्न झाल्यासारखं वाटतंय. अमेरिकेमध्ये मी त्यांच्या जवळ राहायचो. दातृत्व हरपल्यासारखं वाटतंय. आमच्या सगळ्यांच्या वडिलांच्या गुरुस्थानी ते होते. त्यांच्या जवळ जरी उभं राहिलं तरी त्यांची उर्जा, खरेपण अनुभवता यायचं. मला माझ्या भावना व्यक्त करत येत नाहीत. ही दिग्गज मंडळी त्यांच्या कलेमुळे कायमच चिरतरुण असतात.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

तबलावाद्यातलं अत्यंत उत्तुंग व्यक्तीमत्त्व – सुरेश तळवळकर

ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश तळवळकर यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं की, मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, याची मला महिती होती. पण आज झाकीरजी आपल्या नाहीत, ही अत्यंत दु:खद गोष्ट आहे. तबलावाद्यातलं अत्यंत उत्तुंग व्यक्तीमत्त्व, ज्यांच्यामुळे तबलावाद्याला ओळथ मिळाली. तबल्याची ओळख करुन देण्यात झाकीर हुसैन यांचा फार मोठा वाटा आहे. कलाकाराने प्रसिद्धी मिळाल्यावर कसं असायला हवं याविषयी त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं.

तबलावाद्यातलं अत्यंत उत्तुंग व्यक्तीमत्त्व

सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, तबलानवाज उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाची बातमी दुःखद आणि धक्कादायक आहे. ते एक अष्टपैलू कलाकार होते.शास्त्रीय संगीतातील सर्व प्रकारच्या गायकांची त्यांनी तबल्यावर सोबत केली होती.त्यांचे तबलावादन अतिशय लोकप्रिय होते.आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांनी आपली छाप पडली होती. भारतीय शास्त्रीय संगीताला सातासमुद्रापार घेऊन जाणाऱ्या कलाकारांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीतसृष्टीतील तालवाद्याचा जादूगार काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

नितीन गडकरींनी व्यक्त केला शोक

‘प्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. झाकीर हुसैन यांच्या निधनाने देशातील कला-संगीत क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी आहे.कलाक्षेत्रात त्यांचे अभूतपूर्व योगदान आहे. त्यांचे कलेसाठी केलेले समर्पण आणि योगदान सदैव स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना शक्ती देवो. ओम शांती!’