लोकसभेचा पराभव जिव्हारी, एका सिटची किंमत भाजपच्या बड्या नेत्याने मोजली?

0

भाजपचे सलग सात विधानसभा निवडणुका जिंकणारे एकमेव ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले आहे .मुनगंटीवार मंत्रिमंडळात नाही,याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. लोकसभेतील पराभव भाजप पक्ष श्रेष्ठींच्या जिव्हारी लागला म्हणूनच सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट केल्याची चर्चा सुरू आहे.

मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते सात वेळा आमदार राहिले आहेत. भाजपनं त्यांना अर्थमंत्र्यांसारखी महत्वाची खातीही दिली. तसेच ते भाजपचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. ते उच्चशिक्षितही आहेत तरी देखील भाजपने त्यांचा पत्ता कट केला मुख्य कारण लोकसभा मानले जाते.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

इच्छा नसताना दिली उमेदवारी-

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपा महायुतीचे उमेदवार, वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेत दणदणीत विजय संपादन केला असून ते सातव्यांदा विधानसभेत पोहोचले आहे. सातव्यांदा विधानसभेत निवडून जाणारे ते एकमेव उमेदवार आहे. माझं तिकीट कापलं जावं याचे प्रयत्न मीच करतोय, मला दिल्लीला जाण्यात, खासदार होण्यात रस नसल्याचे संकेत मुनगंटीवार अतिशय स्पष्टपणे दिले होते. पण तरी सुद्धा इच्छा नसतान भाजपने मुनगंटीवार यांना लोकसभेला उमेदवारी दिली.

भाजपचं स्वप्न चंद्रपुरात भंगलं-

भाजपनं उमेदवारी दिली आहे. मुनगंटीवार दिल्लीत जाणार अशा चर्चा जोरदार रंगल्या. मात्र मुनगंटीवार यांना ज्याची भीती होती, तेच घडलं आहे अन् मुनगंटीवार यांचा पराभव झाला. मुनगंटीवारांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का होता. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचं भाजपचं स्वप्न चंद्रपुरात भंगलं होते. तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपने मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली. मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी भाजपने देखील कंबर कसली होती. लोकसभेला पंतप्रधान मोदींची पहिली सभा चंद्रपुरात झाली. पण याच सभेत मुनगंटीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोदींच्या सभेचा देखील काही उपयोग झाला नाही.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू : मुनगंटीवार

मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसले तरी पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत. त्यापैकी किमान मुनगंटीवार मंत्री होतील, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मुनगंटीवार यांना स्थान दिले गेले नाही. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते नाराज झाले आहेत.