मुख्यमंत्री फडणवीसांनी संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीत पाठवली पण यामुळं शिंदे आणि अजितदादांचंही टेन्शन वाढवणार?; या आमदारांनाही मंत्रीपद नाहीचं?

0
1

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कोणाकोणाला मंत्रिपद दिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. १४ तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यामुळे त्याआधीच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचा शपथविधी होऊ शकतो. त्याची तयारीही सुरू झाली आहे. आता बातमी अशी आहे की, दिल्लीत नव्या संभाव्य मंत्र्यांची यादी पाठवण्यात आली आहे. तिथे शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्या आमदारांचा मंत्रीपदाचा मार्ग मोकळा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्वच्छ चेहऱ्यांचा समावेश करायचा आहे. मागील सरकारमध्ये भाजपचे १० आणि शिवसेनेचे ९ आणि राष्ट्रवादीचे ९ मंत्री होते. सूत्रांच्या माहितीनुसार, फडणवीस काही मंत्र्यांना पुन्हा संधी देऊ शकतात.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

काही मंत्र्यांना पुन्हा संधी नाही

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह एकूण २८ सदस्य होते. त्यामुळे यंदाही त्या सगळ्यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याची आशा आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या पाच नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास फडणवीस तयार नसल्याचं बोललं जातंय. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे हे नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतात. अशी चर्चा आहे. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून ही काही आमदारांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यास देखील फडणवीस तयार नाहीत. अशीही माहिती आहे.

मुस्लीम आमदारांना ही मंत्रीपद नाही?

फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मुस्लीम नेत्याचा ही सहभाग नसू शकतो. त्यामुळे शिंदे यांच्या सरकारमधील शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून हसन मुश्रीफ यांना मंत्रीपद मिळणार की नाही याबाबत सस्पेंस कायम आहे. भाजपने ही निवडणूक हिंदुत्वाच्या अजेंड्यावर लढवली होती. त्यामुळे त्याचा परिणाम होईल असं फडणवीसांना वाटतंय. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 10 मुस्लीम आमदार निवडून आले आहेत.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

हिंदुत्वाचा अंजेडा

भाजपने आणि पंतप्रधान मोदींनी या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एक है तो सेफ है चा नारा दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस मुस्लीम चेहऱ्यांचा समावेश टाळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे धाडस दाखवू शकतील असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. भाजपने महाराष्ट्रात १४९ जागांवर निवडणूक लढवली होती पण एकाही मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिले नव्हते.