परकीय गुंतवणुकीत राज्य प्रथम, एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य राज्यपाल राधाकृष्णन यांची माहिती

0
1

महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर औद्योगिक राज्य आहे. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये महाराष्ट्राचे १४ टक्यांपेक्षा अधिक योगदान असल्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सांगितले. थेट परकीय गुंतवणुकीसाठी राज्याला अधिक पसंती मिळत असून, २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये १,२५,१०१ कोटींच्या थेट परकीय गुंतवणुकीसह महाराष्ट्र देशात प्रथमस्थानी होता. त्यानंतर या चालु आर्थिक वर्षामध्येही महाराष्ट्रामध्ये एप्रिल ते सप्टेंबर या दोन तिमाहीमध्ये १,१३,२३६ कोटींची परकीय गुंतवणूक आली असून महाराष्ट्र देशात पुन्हा एकदा प्रथम स्थानावर पोचला आहे, असेही राज्यपालांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत अभिभाषणादरम्यान सांगितले.

२०२७-२८ या वर्षांपर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी महाराष्ट्राला देशातील पहिले राज्य बनवण्याचे अत्यंत महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

राज्यपाल म्हणाले…

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत १,१९,७०० उमेदवारांचा सहभाग

राज्य शासनाकडून दीड लाख रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून, ७८,३०९ पदे भरण्यात आली

महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत २ कोटी ३४ लाख महिलांना दरमहा १,५०० रुपये रक्कम दिली. यापुढेही योजना सुरू राहील.