फडणवीसांचा वय काढत आत्मपरीक्षणाचा सल्ला अन् शरद पवारांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हाला राजकारण…

0

विधानसभा निवडणुकांच्या निकालात मतांमध्ये फारसे अंतर नसतानाही सत्ताधारी महायुतीला अधिक जागा मिळाल्याचा मुद्दा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना सल्ला दिला होता. शरद पवार आपण ज्येष्ठ नेते आहात. किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल. तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, असे त्यांनी म्हटले होते. आता शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

ईव्हीएममधून झालेल्या मतदानावर शंका उपस्थित करत सोलापूरच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी (Markadwadi) गावाने मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाने दबाब टाकत अभिरुप मतदानाचा प्रयोग बंद पाडला. आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज मारकडवाडी गावाला दाखल झाले. या गावित सभेत बोलताना शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

अधिक वाचा  महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण दुर्देवी न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

संपूर्ण देशात तुमच्या गावाची चर्चा

शरद पवार म्हणाले की, देशाचे अनेक खासदार मला भेटतात, ते एकच चर्चा करतात ती फक्त तुमच्या गावाची. मला विचारतात की हे गाव कुठे आहे? संपूर्ण देशाच्या जे लक्षात आले नाही ते या गावकऱ्यांच्या कसे लक्षात आले? तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन संपूर्ण देश करत आहे, याचाच आम्हा सर्वांना आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटले.

तुमच्या गावात तुम्हालाच जमावबंदी केली

निवडणूक पद्धतीत काही शंका निर्माण झाली. काही निकाल असे आले की, ज्यामुळे तुमची शंका बरोबर वाटत आहे. आज अमेरिका, इंग्लंडमध्ये ईव्हीएमवर निवडणूक होत नाही. लोकांना स्वतःचे अधिकार देण्यासाठी ईव्हीएम नको असे तिथे म्हणतात. मग आमचाच हट्ट का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मी चार पाच दिवसापूर्वीच येणार होतो. तुम्ही मतदान करायचा निर्णय घेतल्यावर पोलीस खात्याने तुम्हाला थांबवले. तुमच्या गावात तुम्हालाच जमावबंदी केली. हा कुठला कायदा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुम्ही फेर मतदान करण्याचा प्रयत्न केला म्हणून तुमच्यावर खटले टाकले. याचे FIR आम्हाला द्या. सर्व पोलीस खाते व प्रशासनाची भूमिका हे मला सांगा. निवडणूक आयोग, केंद्रीय आयोग, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना आम्ही तुमची भूमिका मांडू. तालुक्यातील सर्व गावात ठराव करा. आम्हाला ईव्हीएम मशीनवर मतदान नको, आणि आम्हाला पद्धतीने निवडणूक पाहिजे, असे ठराव करा. या ठरावाची प्रत आम्हाला द्या. आम्ही ती प्रत निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे सादर करू, असेही शरद पवार यांनी म्हटले.

अधिक वाचा  जनशक्ती पुढे महाशक्ती पराभूत! जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होणार, नैतिकता अखेर जागृत व्यवहारातून बाहेर पडण्याचा विशाल गोखलेंचा निर्णय

पवारांचे फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

शरद पवार पुढे म्हणाले की, काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. त्यांनी म्हटलं की, पवार साहेबांनी हे करणे योग्य नाही. मी काय चुकीची गोष्ट केली? तुमच्या गावी येणे चुकीचे आहे का? तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे का? काही पद्धतीबाबत लोकांच्या मनात शंका आली त्या शंकेची माहिती घेऊन त्याचे निरसन करून त्याच्याबद्दल काळजी घेणं हे काही चुकीचा आहे का? लोकशाही कशासाठी आहे? लोकांचे अधिकार जतन करण्यात अडथळे येत असतील तर लोकप्रतिनिधीने त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, आम्हाला इथे राजकारण आणायचे नाही. तिथे जे घडलंय तिथल्या लोकांच्या मनात जी शंका आहे त्या संख्येचे निरसन करायचा आहे. असं कुठेच होऊ नये जेणेकरून निवडणूक यंत्रणेबाबत गैरविश्वास जनतेच्या मनात निर्माण होईल, असे शरद पवार यांनी म्हटले.

अधिक वाचा  नवे सरन्यायाधीश म्हणून यांच्या नावाची आज शिफारस; सरन्यायाधीश CJI भूषण गवईंनी नावही सांगितले