मोठी बातमी! बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग; शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे परवा म्हणजे रविवारी मारकडवाडी येथे येणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता शरद पवार हे हेलिकॉप्टरने मारकडवाडी येथे येणार आहेत. ईव्हीएम विरोधातील देशात मारकडवाडी हे पहिले गाव होते ज्याने बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन केले होते. याच ठिकाणी आता राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे नेतेही लवकरच भेट देणार असून रविवारी शरद पवार पहिल्यांदा इथे पोहोचणार आहेत.

माळशिरसचे आमदार आणि या आंदोलनाचे नेते उत्तमराव जानकर यांचा शपथविधी देखील रविवारीच होणार होता. मात्र, त्यांनी आता अध्यक्षांची परवानगी घेऊन सोमवारी अध्यक्षांच्या दालनात शपथ घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

पोलीस प्रशासनाने गावात जमावबंदी आदेश लागू केल्यानं मतदान प्रक्रिया थांबवली

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव राज्यभर चर्चेत आलं आहे. कारण या गावातील नागरिकांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती. यासाठी आंदोलन देखील केलं होतं. ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान (Voting) घेण्याची संपूर्ण तयारी केली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने गावात जमावबंदी आदेश लागू करत ही मतदान प्रक्रिया थांबवली होती. त्यामुळं ग्रामस्थांना बॅलेट पेपरवरील इच्छा मतदान घेताच आले नाही. मात्र, या गावाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. मारकडवाडी या ठिकाणी होणारी मतदान प्रक्रिया ही बेकायदेशी असल्याचं प्रशासनाने म्हटलं होतं. तसेच या ठिकाणी जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आले होते. त्यामुळं मतदानाची प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

मारकडवाडीतील ग्रामस्थांवर गुन्हा दाखल

बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करुन भीती निर्माण करत समाजात द्वेषाची भावना निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. बीएनएस 353(1) (ब), 189 (1), (2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माळशिरसच्या नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार