फडणवीसांच्या स्वागतासाठी सिद्धिविनायक मंदिरात शिंदेच्या शिवसेनेचा पराभूत उमेदवार, म्हणाला…

0

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. सीएसटी येथील आझाद मैदानात शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अत्यंत भव्य असा सर्व सोहळा असणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री, सेलिब्रिटी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याआधी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाच दर्शन घेतलं. सिद्धिविनायक देशातील कोट्यवधी भावनिकांच श्रद्धास्थान आहे. कुठल्याही शुभकार्याआधी सिद्धिविनायकाच दर्शन घेण्याची पद्धत आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

देवेंद्र फडणवीस आज सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आले, त्यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने त्यांचं स्वागत केलं. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहीम विधानसभा मतदरासंघातून पराभूत झालेले सदा सरवणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचं सिद्धिविनायक मंदिरात स्वागत केलं. माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणूक लढवत असल्याने महायुतीकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्याचा आवाहन करण्यात आलं होतं. पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अखेर सदा सरवणकर, अमित ठाकरे यांचा पराभव झाला. उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत निवडून आले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

देवेंद्र फडणवीस शपथ घेणार काय सांगाल?

सदा सरवणकर यावेळी म्हणाले की, “राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची निवड झाली, ते देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येणार अशी माहिती मिळाली, म्हणून स्वागतासाठी आलो” देवेंद्र फडणवीस शपथ घेणार काय सांगाल? त्यावर सरवणकर म्हणाले की, “आनंद आहे, राज्याला चांगलं, भरभक्कम सरकार मिळेल, लोकांनी ज्या अपेक्षेने मतदान केलय, निश्चित हे सरकार त्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वास आहे” असं सदा सरवणकर म्हणाले.