पुणे : शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर पुण्यातील एकमेव शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ‘कोथरूड’ शिवसेनेमध्ये उबाठा गटाचे दोन ताकदवार घराणेशाही पण त्यांच्याच मर्जीतील असलेली संघटना यांच्यामुळे कोथरूड भागातील शिवसेना पक्ष बांधणीला आलेल्या मर्यादा भेदण्यास अशीच ‘किरण’निर्माण झाला असून दिवंगत माजी नगरसेवक उत्तम भेलके यांचे चिरंजीव यांच्या रूपाने शिव धनुष्य पेरण्या सक्षम संघटनेचा ‘उदय’ झाला आहे अशी चर्चा या लक्षवेधी प्रवेशामुळे झाली आहे. कोथरूड शिवसेना म्हटलं की पारंपारिक दोन माजी आमदार यांची नाव आणि त्यांच्या समर्थनार्थच असलेली पक्ष कार्य करणे यामुळे शिवसेनेला या भागामध्ये एक सक्षम नेतृत्वाची गरज दिवंगत माजी नगरसेवक उत्तम काका यांचे पुत्र उदय उत्तम भेलके यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पूर्ण झाली असून कोथरूड शिवसेनेमध्ये भक्कम पक्ष बांधणीचा ‘किरणोदय’ म्हणावा अशी ही घटना अचानक घडली आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मराठी माणसाच्या त्याच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्याचे सांगत उदय भेलके यांनी युवासेनेचे सचिव किरण साळी यांच्या उपस्थित शिवसेना पक्ष प्रवेश केला आहे. कोथरूड शिवसेनेमध्ये घराणेशाहीच्या राजकारणालाच पक्षसंघटनेपेक्षा महत्त्व असून नुकत्याच पार पडलेल्या अटीतटीच्या कोथरूड विधानसभा निवडणुकीमध्ये ही पक्षापेक्षा यांची घराणीच मोठी ही मानसिकता पक्षाला हानिकारक बनली होती. पक्षनेतृत्वाने यामध्ये समेळ न घातल्यामुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेला पराभव सहन करावा लागला. आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ही याच घराणेशाहीचा फटका बसून पक्षातील उमद्या कार्यकर्त्यांवर अन्याय न होण्याच्या भूमिकेने उदय भेलके यांनी प्रवेश केला असून कोथरूड भागामध्ये शिवसेनेला मोठी बळकटी देण्यासाठी काम करणाऱ्या दुसऱ्या फळीतील सक्रिय कार्यकर्त्यांना यामुळे न्याय मिळणार आहे.
यावेळी त्यांना कोथरूड विधानसभा मतदार संघाची विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. कोथरूड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या भागात सर्वसामान्य नागरिकांमध्ये पक्षाविषयी प्रचंड असता आणि आपुलकी आहे परंतु गेली तीस वर्षे या मतदारसंघांमध्ये दोन घराण्यांमध्ये सुरू असलेला सुप्त संघर्ष हा नव्या पिढीतील कार्यकर्त्यांवरती अन्यायकारक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र विकासाचे कार्य करत आहेत ते कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला करण्यासाठी त्यांना किरण साळी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख सचिन थोरात आणि उदय भेलके यांचे सहकारी उपस्थित होते.