विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रिपदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे.महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 21, 12, 10 असा असू शकतो. यात भाजपला सर्वाधिक 20 ते 25 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 10 ते 12 आणि राष्ट्रवादीला 7-9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे. याचदरम्यान भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहेत.






भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांची पसंती
गिरीश महाजन – सरकारचे संकटमोचक म्हणून चेहरा, सोबतच उत्तर महाराष्ट्रात भाजपला चांगलं यश लोकसभा आणि विधानसभेत मिळवून दिलंय
रविंद्र चव्हाण – पडद्यामागून काम करणारे व्यक्तीमत्व, भाजपला कोकणातील जागा मिळवून देण्यात चव्हाण यांचा मोठा वाटा
मंगलप्रभात लोढा – मुंबई शहरातून भाजपचा मोठा चेहरा आणि पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं गुजराती, जैन समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाची व्यक्ती
चंद्रशेखर बावनकुळे – विधानसभेत मोठं यश मिळवून दिल्याने पुन्हा एकदा वर्णीची शक्यता
आशिष शेलार – मुंबई अध्यक्षाच्या दृष्टीनं निवडणुकीत चांगली कामगिरी, सोबतच, कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है संदर्भातलं धोरण राबवलं, आणि नोमानीचा व्हीडिओ समोर आणला, अशात पुन्हा मंत्रीपदाची शक्यता
नितेश राणे – हिंदूत्व पोस्टर बाॅय म्हणून राणेंची ओळख, भाजपसाठी हिंदुत्वाचा चेहरा, कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ है चा नारा पुढे नेण्यात मोठं काम
शिवेंद्रसिंहराजे भोसले – पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा, मोठ्या लीडनं शिवेंद्रराजेंचा विजय, भोसले घराण्याचा चेहरा
राहुल कुल – दौंडमधून तिसऱ्या विजयी, राष्ट्रवादी कांग्रेसला सुरुंग लावत पुन्हा आमदार
माधुरी मिसाळ – 2009 पासून पर्वती मतदारसंघातून आमदार, पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं मंत्रीपदाची शक्यता
संजय कुटे – पश्चिम विदर्भातील भाजपचा चेहरा, फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख, सोबतच पडद्यामागून पक्ष करणारे आणि संघाच्या फळीतील चेहरा
राधाकृष्ण विखे पाटील – नगर जिल्ह्यातील चेहरा आणि भाजपातील ज्येष्ठ चेहरा
गणेश नाईक – नवी मुंबईतील भाजपचा मोठा चेहरा, यंदा विजय झाल्याने संधी मिळण्याची शक्यता
पंकजा मुंडे – ओबीसी आणि मराठवाड्यातील चेहरा
गोपीचंद पडळकर – जतमधून आमदार, राम शिंदे हरल्याने रोहित पवारांविरोधात ताकद उभी करत शह देण्याचे प्रयत्न होऊ शकतात, धनगर चेहरा
कोणाला डच्चू मिळण्याची शक्यता-
विजयकुमार गावित
सुधीर मुनगंटीवार
शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-
उदय सामंत शंभूराज देसाई गुलाबराव पाटील संजय शिरसाट भरत गोगावले प्रकाश सुर्वे प्रताप सरनाईक तानाजी सावंत राजेश क्षीरसागर आशिष जैस्वाल निलेश राणे
कोणाला डच्चू मिळणार?
दीपक केसरकर
अब्दुल सत्तार
संजय राठोड
अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
धनंजय मुंडे अदिती तटकरे अनिल पाटील हसन मुश्रीफ
धर्मराव बाबा अत्राम अजित पवार छगन भुजबळ










