कोथरूड विधानसभेचे विधानसभेचे मनसेचे अधिकृत उमेदवार अॅड किशोर नाना शिंदे यांनी शिवाजीनगर पुणे येथील कोर्टातील पुणे वकिल संघटनेचे कार्यालय व सोसायटी ऑफिस येथे सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्या हस्ते कोर्टातील बार रूम मधिल दत्त महाराजांची आरती करण्यात आली. पुणे वकिल संघटनेचे अध्यक्ष अॅड संतोष खामकर व पुणे वकिल सोसायटी चे संचालिका अॅड रेखा कारंडे यांनी अॅड किशोर शिंदे यांना वकिल संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर केला.
यावेळेस वकिल संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड विकास ढगे पाटील म्हणाले की “ अॅड किशोर शिंदे हे पुणे वकील संघटनेचे सदस्य असुन वकिलांच्या आंदोलनात त्यांचा नेहमी सहभाग असतो तसेच ते नगरसेवक असताना २०१२ साली त्यानी पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे म्हणुन त्यानी पुणे महानगर पालिकेत तसा ठराव करून तो मुख्य सभेत मंजुर करून घेवून राज्य सरकार कडे पाठविला होता”
यावेळेस पुणे बारचे विद्यमान उपाध्यक्ष पवन कुलकर्णी सचिव अॅड चेतन हरपाळे पुणे वकिल सोसायटीचे संचालक अॅड हेमंत गुंड, अॅड सत्यजित तुपे, अॅड संजय पवार, अॅड मतीन खान, अॅड शेळके तसेच ज्येष्ठ अॅड अरुण लंबुगोळ अॅड सतिश कांबळे, अॅड सचिन झालटे पाटील, अॅड रविंद्र शिंदे, अॅड चैतन्य दिक्षित, अॅड प्रीती परदेशी ,अॅड महेंद्र नांगरे, अॅड अमेय बलकवडे, अॅड सचिन ननावरे, अॅड अभिषेक जगताप, अॅड शुभांगी बहिरट, अॅड राहुल कदम अॅड नागेश जेधे, अॅड सुरज शिंदे, अॅड रोहित गुजर, अॅड सौरभ तडवी, अॅड सौरभ तडवी ,अॅड पराग दुसाने ,अॅड मुकुल महिंद्रकर, अॅड मधुकर वडगे , अॅड राजाभाऊ राठोड ,अॅड अभिषेक काळभोर ,अॅड मयुर मराठे ,अॅड पूजा चौगुले ,अॅड शैलेश कांचन व अनेक वकील मित्र उपस्थित होते.