गाढव, बांगड्या भरा, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूची BCCI ला शिवीगाळ

0

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवायला नकार दिला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचा आपला निर्णय जाहीर केल्यापासून क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. BCCI च्या निर्णयावरुन पाकिस्तानात हंगामा सुरु आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तनवीर अहमदने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तो शिवीगाळ करण्यावर उतरलाय. त्याने खुलेआम सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत.

भारत पाकिस्तानात येणार नसल्याने तनवीर अहमद मागच्या काही दिवसांपासून आक्रमक वक्तव्य करतोय. ‘बीसीसीायने आपल्या हातात बांगड्या भराव्या’ असं त्याने म्हटलं आहे. तो एवढयावरच थांबला नाही, भारतीय क्रिकेट बोर्डाबद्दल खोटारडे, नीच, बदमाश आणि दुटप्पी असे आपत्तीजनक शब्द वापरले. बीसीसीआयपेक्षा एका गाढवावर विश्वास ठेवणं केव्हाही चांगलं. तो फसवणार नाही असं तनवीर अहमद म्हणाला. त्याने पाकिस्तानी मीडियाला भारतीय मीडियाला बोलवू नका असं अपील केलं.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

पाकिस्तानात टुर्नामेंट झाली नाही, तर दुसरीकडे कुठे होणार?

BCCI च्या या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतासोबत कुठल्याही टुर्नामेंटमध्ये न खेळण्याची धमकी दिली होती. पीटीआयच्या रिपोर्ट्नुसार 12 नोव्हेंबरला ICC ला एक ईमेल पाठवण्यात आला. त्यात टीम इंडियाला न पाठवण्यामागची भारतीय क्रिकेट बोर्डाने ठोस कारणं सांगावी, असं म्हटलं होतं. आयसीसीची सर्व टीम्ससोबत चर्चा सुरु आहे. टुर्नामेंटच्या शेड्युलबद्दलही चर्चा आहे. आयसीसीने बॅकअप प्लान म्हणून दक्षिण आफ्रिकेत टुर्नामेंट आयोजित करण्याचा प्लान तयार ठेवल्याच काही रिपोर्ट्समध्ये म्हटलय.