धक्कादायक 5.5 वर्षांत राज्यात १५८२४ शेतकरी आत्महत्या! दररोज ७ शेतकरी घेतात जगाचा निरोप आत्महत्या अमरावती, छत्रपती संभाजीनगर सर्वाधिक प्रमाण

0

शेतमालाला हमीभाव नाही, नैसर्गिक आपत्तीत नुकसान लाखोंचे अन्‌ मदत काही हजारात, नुकसान भरपाई मिळवण्यासाठीचे निकष आणि दुसरीकडे मुलांचे शिक्षण, मुलीचा विवाह, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न, अशा अडचणी बळिराजासमोर आहेत.

जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०२४ या काळात सोलापूर जिल्ह्यातील ११६ शेतकऱ्यांसह राज्यतील तब्बल १५ हजार ८२४ शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीतून समोर आले आहे.

कोकण विभागात २०१९ या वर्षात एका शेतकरी आत्महत्येची नोंद झाली, पण दिलासादायक बाब म्हणजे २०२० ते सप्टेंबर २०२४ या काळात या विभागात एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही. राज्यातील छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नाशिक, नागपूर या विभागातील आत्महत्यांच्या तुलनेत पुणे विभागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी आहे. पण, अमरावती व छत्रपती संभाजी नगर या दोन विभागात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद मदत व पुनर्वसन विभागाकडे झाली आहे.

चिंतेची बाब म्हणजे २०१९ पासून आजपर्यंत दरवर्षी राज्यात अडीच हजार ते तीन हजारांपर्यंत शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतल्याचेही त्या आकडेवारीतून स्पष्ट होते. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला असून नैसर्गिक आपत्तीतही बॅंका व खासगी शेतकऱ्यांच्या तगाद्यामुळे त्याला टोकाचा निर्णय घ्यावा लागला, असे अनुभव अनेक कुटुंबातील सदस्य सांगतात. दरम्यान, शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला रास्त हमीभाव आणि नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसान भरपाईची मदत लवकर व पुरेशा प्रमाणात (झालेला खर्च निघेल एवढी) मिळावी, मुला-मुलींना मोफत शिक्षण मिळावे, एवढ्याच माफक अपेक्षा आहेत.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

विभागनिहाय स्थिती (२०१९ ते सप्टेंबर २०२४ पर्यंत)

विभाग                             आत्महत्या

कोकण                             १

पुणे                            २१९

नाशिक.                             २,०५९

छ.संभाजी नगर                             ५,३९६

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

अमरावती                             ६,४२१

नागपूर                             १,७२८

एकूण                             १५,८२४

वर्षनिहाय शेतकरी आत्महत्या

सन                           आत्महत्या

२०१९                            २,८०८

२०२०                             २,५४७

२०२१                             २,७४३

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

२०२२                             २,९४२

२०२३                             २,८५१

२०२४                             १,९३३

एकूण                             १५,८२४

दररोज ७ शेतकरी घेतात जगाचा निरोप

छत्रपती संभाजी नगर विभागातील बीड, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, जालना, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये देखील अधिक आत्महत्या होतात अशी वस्तुस्थिती आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यात दररोज सरासरी सात ते आठ शेतकरी जगाचा निरोप घेतात.